Anupam Kher : बाॅक्स ऑफिसवर आमिर-अक्षय आपटले, अनुपम खेर मात्र सुसाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aamir Khan, Akshay Kumar And Anupam Kher

Anupam Kher : बाॅक्स ऑफिसवर आमिर-अक्षय आपटले, अनुपम खेर मात्र सुसाट

Anupam Kher : सध्या अनुपम खेर यांचे चित्रपट यशस्वी होताना दिसत आहेत. एकीकडे आमिर खान आणि अक्षय कुमारचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगल्या कमाईसाठी झगडत आहेत. दुसरीकडे अनुपम खेर (Anupam Kher) एकामागे एक हिट चित्रपट देत आहेत. सध्याच्या घडीला बाॅक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपट कार्तिकेय २ चा (Karthikeya 2) बोलबाला आहे. चित्रपटाच्या यशाच्या आनंदात अनुपम खेर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा: नवाजुद्दीनच्या 'हड्डी' लूकवर अर्चनाची प्रतिक्रिया; म्हणाली - माझे केस...

अनुपम खेर मात्र सुसाट

'द काश्मिर फाईल्स'नंतर अनुपम खेर यांचा कार्तिकेय २ हा चित्रपट (Bollywood News) दमदार कामगिरी करताना दिसत आहे. तेलगू चित्रपट कार्तिकेय २ च्या हिंदी व्हर्जनने बाॅक्स ऑफिसवर आतापर्यंत १६.३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. कार्तिकेय २ मध्ये अनुपम खेर यांनी धन्वंतरी वेदपाठकची भूमिका केली आहे. काश्मीर फाईल्सनंतर हा त्यांचा दुसरा हिट चित्रपट आहे.

त्याला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळाले आहे. चित्रपटाचे यश पाहाता अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. अभिनेता लिहितो, मित्रांनो मी तर सुसाट निघालोय. द काश्मीर फाईल्सनंतर माझी कार्तिकेय २ चित्रपटही ब्लाॅकबस्टर आहे. संपूर्ण टीमचे चित्रपटाच्या यशाबद्दल अभिनंदन. खरे पाहाता काहीही होऊ शकते.

हेही वाचा: Aditya Pancholi : आदित्य पांचोलीची मुंबई उच्च न्यायालयात धाव, 'हे' आहे कारण

कार्तिकेय २ हा १३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. त्याचे दिग्दर्शन चंदू मोंदेती यांनी केले आहे. या चित्रपटात निखिल सिद्धार्थ, अनुपमा परमेश्वरन आणि अनुपम खेर हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. एकीकडे कार्तिकेय १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे आमिर खान (Aamir Khan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फारसे चालले नाहीत.

Web Title: Anupam Kher Express Happiness After Success Of Karthikeya 2

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..