Anurag Kashyap: 'मोदींनी हीच गोष्ट 4 वर्षांपूर्वी केली असती तर..',पीएम वर नाराज अनुराग कश्यप शेवटी बोललाच Anurag Kashyap | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anurag Kashyap

Anurag Kashyap: 'मोदींनी हीच गोष्ट 4 वर्षांपूर्वी केली असती तर..',पीएम वर नाराज अनुराग कश्यप शेवटी बोललाच

Anurag Kashyap हा नेहमीच बिनधास्त एखादं वक्तव्य करतो आणि चर्चेत येतो. आतापर्यंत अनुरागला बॉलीवूड,सेन्सॉरशीप आणि बॉयकॉट ब्रिगेड संदर्भात बोलताना आणि या सगळ्या विरोधात लढताना पाहिलं आहे.

सध्या दिग्दर्शक अनुराग कश्यप आपला नवीन सिनेमा 'ऑल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' चं प्रमोशन करताना दिसत आहे. या प्रमोशन दरम्यान अनुराग कश्यपला एका मोठा प्रश्न विचारला गेला आहे ज्याचं उत्तर नेहमीप्रमाणे अनुरागनं बिनधास्तपणेच दिलं आहे.(Anurag Kashyap on pm modi politicians commenting on bollywood movies boycott trend)

अनुराग कश्यप एके ठिकाणी आपल्या या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय नेते बॉलीवूड सिनेमांवर उठसूठ बोलू लागलेयत यावर केलेल्या कमेंटविषयी अनुराग कश्यपला काय वाटते असा प्रश्न केला गेला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेयत की,''कुणीही राजकारणी आज उठतोय आणि कोणत्याही सिनेमाविषयी बोलू लागतोय.आणि संपूर्ण दिवस मग टी.व्हीवर तेच सुरु राहतं. तेव्हा आता सर्व लोकांनी सिनेमांवर कमेंट करणं सोडायला हवं''

नरेंद्र मोंदींचे हे वक्तव्य ऐकल्यावर लोक सिनेमांना बॉयकॉट करणं सोडून देतील. लोकं पंतप्रधानांच्या या मेसेजला गंभीरतेने घेतील का, कारण याआधी कोणत्याच बड्या नेत्यानं अशाप्रकारे विधान केलं नव्हतं. तेव्हा अनुरागला यावर काय वाटतं असा प्रश्न अनुरागला केला गेला.

हेही वाचा: Swapnil Joshi: मराठी भाषेवरनं स्वप्निलची नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले,'जोशी..'

अनुराग कश्यपनं या प्रश्नाचं उत्तर देत म्हटलं,''हेच त्यांनी ४ वर्षांपूर्वी बोलायला हवं होतं. आता मला नाही वाटत याचा काही परिणाम होईल. आता गोष्टी हाताच्या बाहेर गेल्या आहेत. आता कोणी कोणाचं काही ऐकेल असं वाटत नाही. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या वादावर शांत बसता..बोलत नाही तेव्हा गोष्टी आणखी मोठ्या होतात..सशक्त होतात..आणि हातातून निसटून जातात''.

बॉलीवूडमध्ये बॉयकॉट ट्रेन्ड गेल्या काही दिवसांपासून जोर धरून आहे. शाहरुख आणि सलमान खान व्यतिरिक्त आमिर खान आणि अक्षय कुमार देखील या बॉयकॉट ट्रेन्डचा शिकार झाले आहेत. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींना या ट्रेन्डमुळे नुकसान सहन करावं लागलं आहे.

अनुराग कश्यपविषयी बोलायचं झालं तर त्यानं याआधी अनेक राजकीय मुद्दे आणि बॉलीवूडवर आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. नरेंद्र मोंदींविषयी देखील त्यांनी काही अशी वक्तव्य केली ज्यामुळे मोठे वाद रंगले होते.

अनुराग कश्यपच्या सिनेमाविषयी बोलायचं झालं तर त्यानं 'गॅंग्स ऑफ वासेपुर','ब्लॅक फ्रायडे', 'अगली', ;दोबारा' आणि अशा अनेक गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. अनुरागचा नवीन सिनेमा 'ऑल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' सिनेमात अलाया एफ काम करीत आहे. हा सिनेमा ३ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होत आहे.