फरहान अख्तरच्या मेव्हणीची पावलं पुन्हा वळली मराठी सिनेमाकडे, अनुषा दांडेकर चर्चेत

'बापमाणूस' सिनेमाच्या निमित्तानं पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.
Anusha Dandekar In BaapManus, Marathi Movie
Anusha Dandekar In BaapManus, Marathi MovieInstagram
Updated on

Anusha Dandekar:अनुषा दांडेकर सारखा ग्लॅमरस चेहरा मराठीत दिसणार म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच ठरेल. कारण अनुषा सोशल मीडियावर भलतीच सक्रिय असते आणि तिचे असंख्य चाहते तिथे आहेत. आता फरहान अख्तरची मेव्हणी झाल्यानं आणखी जास्त तिच्या चाहत्यांमध्ये भर पडलीय हे वेगळं सांगायला नको. मराठी असली तरी अनुषाचं बालपण परदेशात गेल्यानं तिला फारसं चांगलं म्हणजे अस्खलित मराठी बोलता येत नाही. पण असं असलं तरी मराठीशी तिची नाळ घट्ट जोडलेली आहे. तिनं मराठी चित्रपटात याआधी काम केलं आहे. आणि आता पुन्हा ती 'बापमाणूस' या नवीन चित्रपटाच्या निमित्तानं मराठीत दिसणार आहे.

निर्माते आनंद पंडित आणि पुष्कर जोग यांच्या निर्मिती संस्था अनुक्रमे आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि गूसबम्प्स एंटरटेनमेंट यांनी एकत्रित निर्मित करत असलेल्या चौथ्या चित्रपटाची घोषणा आज दसरा सणाचे औचित्य साधून सोशल मीडियावर केली . या चित्रपटाचे शूटिंग देखील लंडन मध्ये होणार आहे. (Anusha Dandekar In BaapManus, Marathi Movie)

Anusha Dandekar In BaapManus, Marathi Movie
Adipurush: प्रभास-सैफच्या मानधनात मोठी तफावत,एकाला दिले १०० करोड,तर दुसऱ्याला फक्त...

या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत पुष्कर जोग, अनुषा दांडेकर, कुशल बद्रिके, शुभांगी गोखले आणि बाल कलाकार कीया इंगळे हे आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश फुलपगार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत .

Anusha Dandekar In BaapManus, Marathi Movie
Adipurush: 'मला माहीत होतं सिनेमाला ट्रोल केलं जाणार कारण..',दिग्दर्शक ओम राऊत स्पष्टच बोलला

बाप माणूस चे निर्माते आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग आहेत तर सह निर्माते - वैशाल शाह, राहुल व्ही दुबे हे आहेत .

Anusha Dandekar In BaapManus, Marathi Movie
Adipurush: रावणाचा लूक पाहून भडकल्या जुन्या सीतामय्या; म्हणाल्या,'रावण लंकेचा होता तर मग... '

या महिन्याच्या अखेरीस या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण लंडनमध्ये होणार आहे. पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकर पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र दिसणार आहेत. अनुषा बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटात काम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com