गरोदर अनुष्काचं 'शीर्षासन' ठरतयं धाडसाचं !

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 1 December 2020

गेल्या काही दिवसांपासून अनुष्का आणि तिचं गरोदरपण हे सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल झाले आहे. त्यानिमित्तानं ते दोघेही ट्रोलही झाले आहेत.

मुंबई - प्रसिध्दीसाठी कोण काय करेल याचा काही भरवसा नाही. पूर्वीच्या काळी गरोदर बाईला काय काळजी घ्यावी, काय खावे, कुठली पथ्ये पाळावीत याचे धडे देण्यासाठी घरातील ज्येष्ठ महिलांची भूमिका महत्वाची होती. एकविसाव्या शतकात हे सारं बदलेल्याचं दिसत आहे. त्यात कमालीच्या वेगाने बदलणा-या तंत्रज्ञानामुळे जूनं म्हणून जे काही होतं ते सगळं अडगळीत पडत आहे. गरोदर असणा-या अनुष्कानं केलेलं शीर्षासन आणि त्यात तिचा नवरा विराट कोहलीनं घेतलेला सहभाग यामुळे ती चर्चेत आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनुष्का आणि तिचं गरोदरपण हे सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल झाले आहे. त्यानिमित्तानं ते दोघेही ट्रोलही झाले आहेत. मात्र त्यांना त्याची पर्वा नाही. सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमूर याला ज्या प्रमाणात प्रसिध्दी मिळत आहे त्यावरुन ती भविष्यात विराटच्या मुलालाही मिळेल असा अंदाज आता चाहत्यांनी वर्तवला आहे.

सध्या अनुष्काचं शीर्षासन सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचं दोन्ही पाय पकडून विराटनं तिला सपोर्ट केला आहे. मागील काही दिवसांपासून अनुष्का आपल्या गरोदर काळातील फोटोसेशन मोठ्या प्रमाणात सोशल मीडीयावर व्हायरल करत आहे. त्याला त्या दोघांच्या चाहत्यांची पसंती मिळत आहे.शीर्षासनाचा तो फोटो शेयर करताना अनुष्कानं म्हटलं आहे की, हे शीर्षासन करताना मला विशेष काळजी घ्यावी लागली. त्यात हात, पाय यांचा समतोल साधणे अवघड काम आहे. अशा अवस्थेत असताना तर आणखी काळजी घ्यावी लागते.

हे ही वाचा: बिग बॉस १४: रुबिना दिलैकचा पती अभिनवसोबत यावर्षीच होणार होता घटस्फोट...  

योगा हा माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. डॉक्टरांनी मला सांगितले आहे की, मी सगळी आसनं करु शकते. त्यामुळे मी य़ोगाला याकाळातही जास्त महत्व देत आहे. गरोदर राहण्यापूर्वीही मी योगा करतच होते. त्यामुळे आता मला ते करताना फार अडचणी येत नाहीत.शीर्षासन तर जे मी गेल्या काही वर्षांपासून करत आहे आता ते पुन्हा करण्याचा विचार केला त्यावेळी ते जरा धाडसाचे होते. यावेळी शीर्षासन करताना मी भिंतीचा आधार घेतला आहे. 

राजू श्रीवास्तवच्या वक्तव्याला 'बकवास' म्हणत कृष्णा अभिषेकचं भारती सिंहला समर्थन

मात्र विराटच्या सपोर्टशिवाय हे काही शक्य नव्हतं. हा जो प्रयोग मी काही केला आहे तो माझ्या योगाच्या शिक्षकांच्या देखरेखीखाली झाला आहे हे सर्वांना मला सांगायचे आहे. 2018 मध्ये अनुष्काचा शेवटचा चित्रपट आला होता. ज्यात तिनं शाहरुख बरोबर स्क्रीन शेयर केली होती. तसेच तिची निर्मिती असलेल्या पाताललोक ही मालिकाही लोकप्रिय झाली होती. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anushka Sharma nails the Shirshasana pose with support from husband Virat Kohli