अनुष्काच्या घरी रणवीरनं पाठवला आंघोळीचा साबण; पाहून अभिनेत्रीही चक्रावली

अनुष्का शर्मानं रणवीरच्या या अजब हरकतीची माहिती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करीत दिली आहे.
Anushka Sharma & Ranveer Singh
Anushka Sharma & Ranveer SinghGoogle

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या(Anushka Sharma) घरी रणवीर सिंगचं(Ranveer Singh) एक पार्सल पोहोचलं अन् ते उघडून पाहिल्यावर अभिनेत्री चक्रावल्याचं बोललं जात आहे. स्वतः अनुष्का शर्मानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याविषयीची माहिती दिली आहे. खरंतर हे काही चुकून वगैरे अनुष्काच्या पत्त्यावर पोहोचलेलं पार्सल नसून रणवीरनं स्वतः ते अनुष्काला गिफ्ट म्हणून पाठवलं आहे. आता जुना मित्र रणवीर गिफ्ट पाठवणार म्हणजे काहीतरी महागडं असणार जे अनुष्काला आवडेल आणि ती तिच्या इन्स्टा स्टोरीत रणवीरची प्रशंसा करीत त्याविषयी सांगेल. पण अनुष्का म्हणतेय की ते रणवीरचं गिफ्ट पाहून ती चक्क चक्रावली. काय पाठवलं आहे असं रणवीर सिंगनं?

तर रणवीर सिंगनं आपल्या लाडक्या जुन्या मैत्रिणीला सुगंध नसलेला साबण पाठवला आहे. आणि त्यानं तिला तो साबण संपू्र्ण कुटुंबाला वापरण्यासाठी दे असा सल्लाही दिला आहे. खरंतर,रणवीर सिंग आपला नवा सिनेमा 'जयेशभाई जोरदार' साठी जोरदार प्रमोशन करीत आहे. या सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानंच रणवीरनं हा सुगंध नसलेला साबण अनुष्काला पाठवला आहे. रणवीर सिंगच्या 'जयेशभाई जोरदार' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आणि ट्रेलरची घोषणा हटके पद्धतीनं करण्यासाठीच त्यानं ही अनोखी पद्धत वापरली आहे. रणवीरनं फक्त अनुष्काला हा साबणच गिफ्ट म्हणून पाठवला नाही तर 'जयेशभाई जोरदार'कडून त्यानं तिला एक लांबलचक पत्रही लिहून पाठवलं आहे.

Anushka Sharma & Ranveer Singh
लग्नात फेऱ्यांपेक्षा जास्त 'Kiss' केल्यानं रणबीर-आलिया झाले ट्रोल

रणवीरच्या या अनोख्या गिफ्टचा आणि पत्राचा फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करीत अनुष्कानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,''जयेशभाई जोरदार च्याआधीच त्यानं पाठवलेल्या सुगंध नसलेल्या साबणानं आणि त्या खास पत्रानं माझी सिनेमा पाहण्याची उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळे मी आता सिनेमात काय पहायला मिळेल याचा अंदाज मनात लावत आहे''.

Anushka Sharma & Ranveer Singh
कृती सनन कोणाला करतेय डेट?अभिनेत्रीच्या इन्स्टा स्टोरीत दिसला मिस्ट्री बॉय

'जयेशभाई जोरदार'च्या अंदाजात रणवीरनं अनुष्काला लिहिलेल्या पत्रात प्रवीणगढ मधील आपल्या आयुष्याविषयी लिहिलं आहे. हे पत्र हिंदीत लिहिलं आहे,“आदरणीय अनुष्का, यह बिना खुशबू का साबुन हमारे प्रवीणगढ़ का एक उन्नत आविष्कार है। हमारी बेटियों और बहुओं को सिर्फ इसी से नहाने की इजाजत है। ऐसा क्यों है? ये हमारे में नहीं पूछते।" अशा पद्धतीचा पत्रातील मजकूर आहे. जयेशभाईनं पुढे लिहिलं आहे,"मैं आपको यहां जरूर बुलाता लेकिन हमारा टोल नाका पार करते ही आपको घूंघट प्रथा का पालन करना पड़ेगा। फिर कुछ नही दिखेगा। बेहतर होगा कि मैं आपको प्रवीणगढ़ के जीवन की एक झलक भेजूं। जिसे आप सपरिवार आपकी मर्जी अनुसार अनुभव कर सकें। अभी के लिए यह पारंपरिक साबुन भेज रहा हूं। आपका, जयेशभाई जोरदार।” अशा प्रकारे हटके अंदाजात या सिनेमाच्या ट्रेलरचं प्रमोशन करण्यात आलं आहे.

Anushka Sharma & Ranveer Singh
एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदूकोणचं रणबीरला लग्नात सगळ्यात महागड गिफ्ट

रणवीर सिंगचा जयेशभाई जोरदार सिनेमा यश राज फिल्म्स बॅनर अंतर्गत बनवला गेला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन दिव्यांग ठक्करनं केलं आहे. जयेशभाई जोरदार यावर्षी १३ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com