Anushaka Sharma: 'जो इस जोडी से जले, वो जरा साईडसे चले!' ती पोस्ट व्हायरल होताच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anushaka Sharma News

Anushaka Sharma: 'जो इस जोडी से जले, वो जरा साईडसे चले!' ती पोस्ट व्हायरल होताच...

Anushka Sharma: सोशल मीडियावर ज्या सेलिब्रेटींची नेहमीच चर्चा होत असते त्या विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्काच्या व्हायरल होणाऱ्या पोस्टवर नेटकरी (social media post news) मोठ्या उत्साहानं प्रतिक्रिया देताना दिसतात. वास्तविक आपल्याला ट्रोल करणाऱ्यांना अनुष्कानं अनेकदा कडक भाषेत उत्तरही दिलं आहे. मात्र ऐकतील ते नेटकरी कसले याचा प्रत्यय त्या दोन्ही सेलिब्रेटींनी अनेकदा (bollywood news) घेतला आहे. आताही अनुष्कानं विराटसाठी एक खास पोस्ट शेयर केली आहे. त्यावरुन तिला ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्याची चर्चा सुरु झाली आहे.

यापूर्वी अनुष्कानं विराटविषयी ज्या पोस्ट केल्या आहेत त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि मीम्स यावरुन त्यांना ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. येत्या काळात अनुष्काचा चकदा एक्सप्रेस नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचे जोरदार प्रमोशन अभिनेत्रीनं सुरु केलं आहे. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर अनुष्का एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार असल्यानं चाहत्यांनी तिच्या या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षाही आहेत. भारतीय महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.

सध्या अनुष्का ही लंडनमध्ये आहे. तिनं यानिमित्तानं विराटसाठी एक खास पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये ती लिहिते, विराट मिस यू....ती पोस्ट व्हायरल होताच अनुष्काच्या चाहत्यांनी तिला भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं लिहिलं आहे, तुम्ही दोघेही कमाल आहात, तुमच्यातील बाँडिंग हे आम्हाला नेहमीच प्रेरणा देतं. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, 'जो इस जोडी से जले, वो जरा साईडसे चले!' यासारख्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा: Alia-Ranbir: 'आलिया हे शोभलं का तुला?' सगळ्यांसमोर रणबीरसोबत केलं असं काही...

हेही वाचा: Shama Sikander: 'हवा में उडता जाये तेरा...'

जग हे अधिक भव्य दिव्य वाटू लागलं आहे. त्याला सामोरं जाताना अधिक रोमांचित झाल्याच अनुभव येतो आहे. पतीला अधिक मिस करत आहे. त्याची खूप आठवण येत आहे. अनुष्काच्या त्या पोस्टला सर्वाधिक लाईक्स आणि प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

Web Title: Anushka Sharma Special Post Husband Virat Kohli Romantic Line Fans Carzy Comment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..