Bigg Boss Marathi 4: एक नंबरचा खोटारडा माणूस.. किरण मानेवर अपूर्वा भडकली..

बिग बॉस मराठीच्या चावडीवर अपूर्वाचा राग अनावर, किरण मानेला जागा दाखवली..
apurva nemlekar slams kiran mane on Bigg Boss Marathi 4 chavdi
apurva nemlekar slams kiran mane on Bigg Boss Marathi 4 chavdisakal

bigg boss marathi S 4: बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन आता जवळपास पन्नास दिवसांचा टप्पा पूर्ण होत आला आहे. आजवर बिग बॉसच्या घराने आपले खूप मनोरंजन केले. या पन्नास दिवसात आपण राडा, प्रेम, दंगा, तोडफोड सगळंच पाहिलं. स्पर्धक जातानाचे भावनिक क्षण अनुभवले तर कधी एकमेकांना घराबाहेर काढण्याची चढाओढ. आठवड्याभरात कितीही राडा घातला तरी सर्वांना उत्सुकता असते ती 'चावडी'ची.. कालची म्हणजेच शनिवारची चावडी एकदम जोरदार पार पडली. आजच्या चावडीत अपूर्वा आणि किरण यांच्यात खडाजंगी होताना दिसणार आहे..

(apurva nemlekar slams kiran mane on Bigg Boss Marathi 4 chavdi)

apurva nemlekar slams kiran mane on Bigg Boss Marathi 4 chavdi
Hemangi Kavi: सुश्मिता सारख्या लफडेबाज बाईला दुर्गा.. चाहत्याची कमेंट, हेमंगीचे सडेतोड उत्तर

आपण पाहिलं की, कालच्या चावडीवर मांजरेकरांनी अमृता धोंगडेची चांगलीच शाळा लावली. तू बाळबोध आहेस म्हणून तिच्यावर निशाणा साधला. तू सतत कोणाशीतरी वाद घालत असतेस. तेजस्विनी प्रसादशी बोलते म्हणून तू तिच्याशी बोलणं सोडलं, अत्यंत बालिश आहेस तू, असे मांजरेकर म्हणाले. यावेळी मांजरेकर चांगलेच संतापले होते. तर अमृता देशमुख आणि प्रसाद यांच्यावरही निशाणा साधला, तुम्ही ते करताय, बोलताय ते कुणाच्याच लक्षात येत नाही, जे करतायत ते आम्हाला समजेल असं तरी करा.. म्हणत त्यांनाही चुका दाखवल्या.

apurva nemlekar slams kiran mane on Bigg Boss Marathi 4 chavdi
Tushar Kapoor Birthday: लग्न न करताच झाला बाप! सिंगल राहण्यामागचं 'हे'आहे कारण..

कालच्या भागात चावडी सोबतच एक मोठा धक्का स्पर्धकांना बसला तो म्हणजे एक सदस्य घराबाहेर गेला. काल यशश्री मसुरकर घराबाहेर पडली. आजच्या चावडीतही एकजन बाहेर पडणार आहे. पण त्यापूर्वी बिग बॉसनं स्पर्धकांना एक टास्क दिलेला आहे. या टास्क दरम्यान अपूर्वा आणि किरण ह्यांच्यात चांगलीच वादावाद होते. त्याचाच प्रोमो सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये किरण म्हणताना दिसत आहे की, 'एक वाक्य खूप छान होतं किरण आणि अपूर्वाचं.. बिग बॉसना ती खूपच हलक्यात घेते.' हे वाक्य ऐकताच अपूर्वा चांगलीच भडकते. तू एक नंबरचा खोटरडा माणूस आहेस.. असं टी किरणला म्हणते, त्यावर किरण म्हणतो.. 'प्रोजेक्शनच्या नावाखाली आक्रसताळे पणा करू नकोस.. हिडीस दिसतय ते..' त्यावर अपूर्वा म्हणते, 'मी हिडीस दिसूदे नाहीतर कशीही दिसूदे.. मी माझं बघेन.. तू कसा दिसतोय ते बघ एकदा..' त्यामुळे हा वाद आता किती रंगणार आणि काय राडा होणार ही आजच्या भागात कळेलच..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com