Apurva Nemlekar: 'माझ्या सगळ्या मैत्रिणींना मुलंही झाली आणि मी अजून फक्त..',अपूर्वाच्या मनात काय सलतंय? Bigg Boss Marathi fame | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apurva Nemlekar Video

Apurva Nemlekar: 'माझ्या सगळ्या मैत्रिणींना मुलंही झाली आणि मी अजून फक्त..',अपूर्वाच्या मनात काय सलतंय?

Apurva Nemlekar Video: अपूर्वा नेमळेकर म्हणजे 'रात्रीस खेळ चाले' मधली शेवंता हे समीकरण आता मागे पडत चाललंय याला कारण बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनमध्ये दिसलेली रोखठोक अपूर्वा. जे मनात ते तोंडावर..जशी आहे तशी स्विकारा नाहीतर..असं म्हणत सगळ्यांना फाट्यावर मारणारी अपूर्वा अनेकांना आगाऊ जरी वाटत असली तरी तिच्या या खऱ्या स्वभावावर अनेकजण फिदाही झालेले आपण पाहिले असतील.

अपू्र्वाचं शेवटच्या क्षणी विजेतेपद हुकलं असलं तरी बिग बॉसमुळे तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये जबरदस्त वाढ झालीय. सोशल मीडियावर ती जे पोस्ट करेल त्याची चर्चा रंगते. सध्या तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो चांगलाच व्हायरल झाला आहे.(Apurva Nemlekar with trishul Marathe video goes vira)l

अपू्र्वा नेमळेकर सध्या सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते. ती अनेकदा तिचे फोटो..व्हिडीओ तिथे पोस्ट करते. आजकाल तर ती बिग बॉस फेम त्रिशुल मराठे सोबत अनेकदा कॉफी डेटवर गेलेली दिसते. अर्थात आपल्या सगळ्यांनाच माहितीय की बिग बॉसच्या घरात त्रिशुल आणि अपूर्वात चांगली मैत्री होती. अपूर्वानं लेटेस्ट पोस्ट केलेला व्हिडीओ देखील त्रिशुलसोबतचाच आहे. पण त्यात अपू्र्वानं व्यक्त केलेली सल मात्र अधिक चर्चेत आली आहे.

या व्हिडीओत अपूर्वा कोणत्यातरी कॉफी शॉप मध्ये बसली आहे. तेवढ्यात तिची ऑर्डर केलेली कॉफी येते अन् कॉफीचा मग हातात घेतल्या घेतल्या अपूर्वा म्हणते की,'' माझ्या सगळ्या मैत्रिणींची लग्न होतायत..त्यांना मुलं होतायत आणि मी...फक्त कॉफी पित बसलीय''. तितक्यात त्रिशुल तिकडे येतो....

यात अपू्र्वानं लग्नाविषयीची आपल्या मनातील सल व्यक्त केली आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

बिग बॉस मराठीतून बाहेर पडल्यावर अपूर्वा आता किरण मानेसोबत लवकरच 'रावरंभा' या सिनेमात दिसणार आहे. तिच्या 'डिलिव्हरी बॉय' या शॉर्ट फिल्ममधील अभिनयाचं जोरदार कौतूकही झालं आहे. त्यामुळे अर्थातच आता उत्सुकता आहे ते तिच्या 'रावरंभा' सिनेमाची.