A R Rahman: ए आर रहमानने असोसिएशनला धाडली चक्क 10 कोटी रुपयांची नोटीस!

AR Rahman Files 10 Crore Defamation Suit Against Surgeons Association,
AR Rahman Files 10 Crore Defamation Suit Against Surgeons Association, Esakal

AR Rahman Defamation Case: ए.आर. रहमानने गेल्या काही दिवसांपासून चेन्नई कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे. या कॉन्सर्टमधील गैरव्यवस्थापनामुळे त्याच्यावर खुप टीकाही झाली होती. त्यात काही आठवड्यांनंतर असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियाने रहमानच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

2018 मध्ये असोसिएशनच्या 78 व्या वार्षिक परिषदेत रहमान शो करणार होता, परंतु तो उपस्थित राहू शकला नाही, असा आरोप करत सर्जन असोसिएशनने रहमानविरोधात तक्रार दाखल केली होती.

AR Rahman Files 10 Crore Defamation Suit Against Surgeons Association,
Khatron Ke Khiladi Season 13 Winner: फिनाले पुर्वीच 'खतरों के खिलाडी 13'च्या विजेत्याचे नाव समोर!

रहमानने अॅडव्हान्स बुकिंग म्हणून घेतलेली रक्कमही परत केली नाही, असा आरोप असोसिएशनने केला होता. आता ए आर रहमानच्या वकिलाने या असोसिएशनने लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

इतकच नाही तर ए आर रहमानने असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियाला 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ASICON ने जारी केलेल्या कायदेशीर नोटीसला उत्तर देताना रहमानने असोसिएशनवर त्याच्या नावाची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. रहमानने आता ASICON वर मानहानीचा खटला दाखला केला असून 10 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे.

AR Rahman Files 10 Crore Defamation Suit Against Surgeons Association,
Mahira Khan Wedding: आईच्या दुसऱ्या लग्नात लेकाला अश्रू अनावर! माहिरानं शेयर केला खास व्हिडिओ

तर रहमान यांची वकिल नर्मदा संपत यांनी या आरोपानंतर चार पानी उत्तर दिले आहे ज्यात असोसिएशनसोबत रहमानने कोणताही करार केलेला नव्हता त्याचबरोबर यासाठी रक्कमही न घेतल्याचे तिने सांगितले.

केवळ प्रसिद्धीसाठी असोसिएशनने हे आरोप केले असल्याचे या उत्तरात म्हटलं आहे. याशिवाय रहमानच्या वकिलाने त्याची बदनामी केल्याबद्दल असोसिएशनकडून 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली.

AR Rahman Files 10 Crore Defamation Suit Against Surgeons Association,
Soha Ali Khan Birthday: ऑक्सफर्डमधून शिक्षण, बँकेत नोकरी मात्र बॉलिवूडमध्ये झाली फेल! पतौडी खानदानाचा वारसा लाभलेली सोहा

कायदेशीर नोटीसमध्ये, त्यांनी असोसिएशनला एआर रहमानची बिनशर्त माफी मागण्यास सांगितले. याशिवाय वकिलाने रहमानची बदनामी केल्याबद्दल असोसिएशनकडून 15 दिवसांत 10 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली. जर असोसिएशनने नुकसान भरपाई दिली नाही तर रहमान कायदेशीर आणि फौजदारी कारवाई करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com