Khatron Ke Khiladi Season 13 Winner: फिनाले पुर्वीच 'खतरों के खिलाडी 13'च्या विजेत्याचे नाव समोर!

Khatron Ke Khiladi Season 13 Winner:
Khatron Ke Khiladi Season 13 Winner:Esakal
Updated on

Khatron Ke Khiladi Season 13 Winner: टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शोपैकी एक असलेल्या 'खतरों के खिलाडी'चा 13' वा सिझन लवकरच संपणार आहे. आता या शोच्या ग्रँड फिनालेसाठी काहीच दिवस उरले आहेत. हा एक स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो आहे.

या सिझनला त्याचे टॉप पाच स्पर्धक मिळाल्यानंतर विजेता कोण असणार याबाबच सर्वांनाच उत्सुकता होती. शोच्या ग्रँड फिनालेमध्ये विजेत्याची घोषणा केली जाणार आहे. मात्र त्यापुर्वीच विजेत्याचे नाव समोर आले आहे.

रोहित शेट्टी हा शो होस्ट करत आहे. या शो चा ग्रँड फिनाले 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी प्रसारित करण्यात येणार आहे. मात्र आता सोशल मीडियावर विजेत्या स्पर्धकाचे नाव व्हायरल होत आहे.

Khatron Ke Khiladi Season 13 Winner:
Mahira Khan Wedding: आईच्या दुसऱ्या लग्नात लेकाला अश्रू अनावर! माहिरानं शेयर केला खास व्हिडिओ

ऐश्वर्या शर्माने सर्वांना टक्कर देत थेट 'तिकीट टू फिनाले' जिंकले आहे. गेल्या काही दिवसांपासून ती काही खास कामगिरी करु शकत नव्हती मात्र अचानक तिने आपल्या खेळात काही बदल केले आणि थेट फिनालेच गाठले. यामुळे रोहित शेट्टीही थक्क झाला होता. तिने डिनो जेम्स आणि रश्मीत कौर यांचा पराभव केला.

आता रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात येत आहे की, ऐश्वर्या शर्मा, अरिजित तनेजा आणि डिनो जेम्स 'खतरों के खिलाडी 13' च्या टॉप 3 फायनलिस्ट आहेत.

Khatron Ke Khiladi Season 13 Winner:
Jawan SRK Fan Meet: कोणी मिठी मारलं, कोणी पाया पडलं, जवान सुपरहिट झाल्याने शाहरुखचं फॅन्सना खास गिफ्ट

Siasat.com च्या रिपोर्टनुसार, रॅपर डिनो जेम्स 'खतरों के खिलाडी 13' चा विजेता ठरला आहे. त्याने ऐश्वर्या शर्मा आणि अरिजित तनेजा या इतर दोन स्पर्धकांना पराभव केला आहे. डिनोने 'खतरों के खिलाडी 13' ची ट्रॉफी आणि बक्षीस रक्कम आपल्या नावे केली आहे. ऐश्वर्या शर्मा या शोची फर्स्ट रनर अप तर अरिजित तनेजा सेकंड रनर अप ठरले आहेत.

Khatron Ke Khiladi Season 13 Winner:
Soha Ali Khan Birthday: ऑक्सफर्डमधून शिक्षण, बँकेत नोकरी मात्र बॉलिवूडमध्ये झाली फेल! पतौडी खानदानाचा वारसा लाभलेली सोहा

खतरों के खिलाडी 13 च्या ग्रँड फिनालेमध्ये जवळपास सर्व 14 खेळाडूंनी भाग घेतला होता. ऐश्वर्या व्यतिरिक्त शिव ठाकरे, अरिजित तनेजा, दिनो जेम्स आणि नायरा बॅनर्जी हे देखील फायनलच्या शर्यतीत पोहचले होते. हा शो कलर्स टीव्हीसह जिओ सिनेमावर देखील प्रसारित केला जाईल. यावेळी शोचे संपूर्ण शूटिंग केपटाऊनमध्ये झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com