

Arbaaz Khan dating make-up artist Shura Khan: बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खान हा त्याच्या कामामुळे कमी पण त्याच्या नात्यामुळे चर्चेत आहे. मलायका अरोरा सोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाज खान त्याच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत होता. त्याने जॉर्जिया एंड्रियानीला बरेच वर्ष डेट केले. मात्र नंतर त्यांचा ब्रेकअप झाला. स्वत: जॉर्जिया एंड्रियानीने अरबाजसोबत ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं. मात्र आता अरबाज पुन्हा प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे.
रिपोर्ट्सनुसार, अरबाज खान बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट शूरा खानला डेट करत आहे. इतकच नाही तर हे जोडपे त्यांच्या नात्याबद्दल खूप गंभीर आहे आणि लवकरच लग्न करणार आहे. इतकच नाही तर ते 24 डिसेंबर मुंबईमध्ये लग्न करणार आहे ज्यात फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहे.
अरबाजचा आगामी चित्रपट पटना शुक्लाच्या सेटवर या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती, हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.
शूरा खान ही मेकअप आर्टिस्ट आहे. तिने इंस्टाग्रामवर सांगितल्याप्रमाणे ती बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानी यांची मेकअप आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते.
1998 मध्ये अरबाज खान आणि मलायका अरोराने लग्न केले होते. त्यांचा मार्च 2016 मध्ये घटस्फोट झाला. यानंतर, अरबाजने जॉर्जिया एंड्रियानीसोबतच्या नात्याची 2019 मध्ये पुष्टी केली. मात्र काही काळापुर्वीच त्यांचे ब्रेकअप झाले. आता पुन्हा अरबाज लग्न करणार अशी चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.