
Archana Gautam: ' ती लई मारेल तुला', अर्चनाचा सुम्बुलच्या मित्रासोबत 'बेशरम' डान्स! नेटकरी सुसाट...
'बिग बॉस 16' च्या फिनालेनंतर सर्वजण मस्तीच्या मूडमध्ये दिसले. नंतर फराह खानने तिच्या घरी सर्व स्पर्धकांसाठी एक पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये सर्वजण आले होते पण गौतम आणि अंकित दिसले नाहीत.
फराह खानची पार्टी ग्लॅमरस स्पर्धकांनी भरलेली होती. यामध्ये सर्वांनी डान्स केला. मात्र चर्चा सुरु झाली ती अर्चना गौतमच्या डान्सची.. अर्चनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती सुंबुलचा मित्र फहमनसोबत डान्स करताना दिसत आहे.
अर्चनाने पार्टीत सगळ्यांसोबत खूप मजा केलेली दिसते. तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो दीपिका पदुकोणच्या 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' वर नाचताना दिसतेय. सुंबूल तौकीर खानचा जवळचा मित्र फहमान खानसोबत तिची केमेस्ट्री दिसत आहे.
हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देणं सुरु केलं आहे. सुम्बुलच्या चाहत्यांनी 'सुंबुल मारेल तुला' असं लिहिलयं. एकानं लिहिलयं, 'सस्ती औरत को देखो...', 'सुंबुलच्या बीएफसोबत नाचतेय बघा'.
या पार्टीला 'बिग बॉस 16' च्या अनेक स्पर्धकांनी हजेरी लावली होती ज्यात निमृत कौर अहलुवालिया, अब्दू रोजिक, प्रियांका चहर चौधरी, शिव ठाकरे, मन्या सिंग, साजिद खान आणि अर्चना गौतम यांचा समावेश होता. अर्चनाचा फहमनसोबतचा डान्स चांगलाच व्हायरल होत असून लोक त्यावर मजेशीर कमेंटही करत आहेत.