esakal | "कपिलच्या शोमध्ये सिद्धू परत आले तर मी.."; अर्चनाचं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Archana Puran Singh and navjot singh sidhu

"कपिलच्या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू परत आले तर.."; अर्चनाचं उत्तर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

सध्या पंजाबमधल्या राजकीय भूकंपाची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी Navjot Singh Sidhu पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोशल मीडियावर 'द कपिल शर्मा शो' आणि या शोमधील अर्चना पुरण सिंग Archana Puran Singh यांची चर्चा झाली. सिद्धूंनी राजीनामा दिल्याने ते पुन्हा शोमध्ये परततील आणि अर्चनाला शो सोडावा लागेल, अशा चर्चा नेटकऱ्यांमध्ये होऊ लागल्या आहेत. २०१९ मध्ये सिद्धूंनी हा शो सोडल्यानंतर त्यांची जागा अर्चनाने घेतली होती. तेव्हापासून अर्चना 'द कपिल शर्मा शो'मध्ये पाहुण्या परीक्षकाची जबाबदारी सांभाळतेय. सिद्धू आणि अर्चना यांच्याविषयी सोशल मीडियावर बरेच मीम्ससुद्धा व्हायरल झाले. त्यापैकी एक मीम खुद्द अर्चनाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, अर्चना सिद्धूंच्या परतण्याविषयी व्यक्त झाली आहे. The Kapil Sharma Show

काय म्हणाली अर्चना पुरण सिंग?

"जर सिद्धूंना खरंच शोमध्ये माझ्या जागी परत यायचं असेल तर माझ्याकडेही इतर अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अनेक प्रोजेक्ट्स मी नाकारल्या होत्या. आठवड्यातील दोन दिवस शोसाठी द्यावे लागत असल्याने मला मुंबई किंवा देशाबाहेर असणारे इतर कुठलेही काम घेता आले नाही. परदेशातील विविध ठिकाणांहून मला ऑफर्स आल्या होत्या, मात्र शोमुळे मी त्यांना नकार देत होते. द कपिल शर्मा शोचे लेखक विविधांगी विनोद लिहितात आणि मला त्यावर खरंच खूप हसू येतं. प्रत्येक एपिसोडसाठी विनोद लिहिणं सोपं काम नाही आणि गेल्या दहा वर्षांपासून टीम हे काम अविरतपणे करत आहे. पण ज्यांना असं वाटतं की शोमध्ये काहीच करत नाही, त्यांनी सहा-सात तास एकाच ठिकाणी बसून दाखवावं. मला चार ते सात तास त्या सोफ्यावर स्टेजच्या दिशेने पाहत सलग बसावं लागतं. प्रत्येक विनोद ऐकून त्यावर प्रतिक्रिया द्यावी लागते. हे खरंच काही सोपं काम नाही", अशा शब्दांत अर्चनाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: माझी तुझी रेशीमगाठ: शेफालीचा पती आहे 'मुंबई इंडियन्स'चा प्रमुख व्यक्ती

हेही वाचा: प्रकृतीच्या कारणास्तव शिवलीला पाटील 'बिग बॉस'च्या घराबाहेर

यापूर्वी अर्चना यांनी सिद्धू यांच्या निवडीवर त्यांचे अभिनंदन करताना, तुम्ही प्रदेशाध्यक्ष झालात पण मोठ्या प्रमाणावर फुलांचे बुके मला मिळाले आहेत, असं सिद्धू यांना सांगितलं होतं. सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर विनोदी मीम्स शेअर करत नेटकऱ्यांनी लिहिलं आता काँग्रेसनं अर्चना पुरण सिंग यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करावी. कित्येकांनी बॉलीवूडच्या काही चित्रपटांमधील विनोदी प्रसंगाचे मीम्स तयार करुन सिद्धू आणि अर्चना यांना ट्रोल केलं होतं.

loading image
go to top