तुम ही हो.. म्हणत अरजित सिंहने घटस्फोटित मैत्रिणीसोबत केले लग्न...

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 7 June 2020

आशिकी 2 मधील 'तुम ही हो..' या गाण्यामुळे तो स्टार बनला आणि त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज हिंदी चित्रपटसृष्टीत त्याने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

मुंबई ः मस्त मगन, मनवा लागे रे, फिर ले आया दिल,  छन्ना मेरे...यासारखी गाणी गाणारा गायक व संगीतकार म्हणजे अरजित सिंह. फेम गुरुकुल या कार्यक्रमाद्वारे अरजितने आपल्या करिअरला सुरुवात केली. प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्याला आपल्या 'सावंरिया' या चित्रपटात संधी दिली. परंतु काही कारणामुळे ते गाणे येऊ शकले नाही. 

वाचा ः सकारात्मक बातमी! कोरोना रुग्णांसाठी स्टीम थेरपी ठरतेय गुणकारी! वाचा बातमी सविस्तर

मात्र, अरजित प्रयत्न करीत राहिला आणि आशिकी 2 मधील 'तुम ही हो..' या गाण्यामुळे तो स्टार बनला आणि त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज हिंदी चित्रपटसृष्टीत त्याने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. परंतु अरजितने एका मुलाची आई असलेल्या महिलेशी लग्न केले आहे हे कित्येकांना ठाऊक नसेल. परंतु ही बाब खरी आहे.

वाचा ः शाब्बास योद्ध्यांनो... मुंबईतील पोलिसांनी केली कोरोनावर यशस्वी मात

अरजित सिंह हा सध्याचा हिंदी चित्रपटसृष्टीतला आघाडीचा गायक व संगीतकार आहे. कित्येक निर्माते त्याला आपल्या चित्रपटासाठी घेण्यास उत्सुक असतात. कित्येक चित्रपट आता त्याच्याकडे आहेत आणि लाॅकडाऊनंतर तो त्यावर काम करणार आहे. आपल्या प्रामाणिक कामाबरोबरच पहिल्या पतीपासून मूल असलेल्या एका महिलेला त्याने पत्नी म्हणून स्वीकारले आहे आणि बिनशर्त प्रेम काय असते हे त्याने सगळ्यांना दाखवून दिले. 2013 मध्ये एका रिअॅलिटी शोमध्ये भेटलेल्या एका मुलीसोबत अरजितने लग्न केले. पण ते लग्न फार काळ टिकले नाही. 

वाचा ः मुलाचे लग्न साधेपणाने करत कोव्हिड योद्ध्याने सहकाऱ्यांसाठी केला 'हा' उपक्रम 

त्यानंतर सन 2014 मध्ये अरजितने आपली बालपणीची मैत्रीण कोयना रॉयबरोबर लग्न करण्याचा विचार केला. कारण ते दोघांना चांगले ओळखत होते आणि त्यांचे एकमेकांवर प्रेमही होते. परंतु काही कारणास्तव कोयनाला दुसऱ्याच व्यक्तीशी लग्न करावे लागले. तिला एक मुलगाही झाला. पण तिचा हा विवाह फार काळ टिकला नाही. तिने आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि अरजितबरोबर पुन्हा विवाह केला. अरजितने आपल्या प्रेमाचा स्वीकार केला. कोयनाला तिच्या मुलासह त्याने स्वीकारले आणि आता ते आनंदी जीवन जगत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arijit singh married with childhood friend who got divorce