ब्रेकअपच्या चर्चांवर अर्जुन-मलायकाचं उत्तर; पोस्ट केला खास सेल्फी | Arjun Kapoor & Malaika's Answer To Rumours About Break Up | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun Kapoor & Malaika's Answer To Rumours About Break Up

ब्रेकअपच्या चर्चांवर अर्जुन-मलायकाचं उत्तर; पोस्ट केला खास सेल्फी

बॉलिवूडमधील सर्वाधित चर्चेत असलेली जोडी अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांच्यामध्ये काहीतरी बिनसल्याचा अंदाज नेटकरी गेल्या काही दिवसांपासून वर्तवत आहेत. ब्रेकअपच्या या चर्चांना मलायका-अर्जुनने आपल्याच अंदाजात पूर्णविराम दिला आहे. अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मलायकासोबतचा खास सेल्फी पोस्ट केला आहे. तर मलायकानेही त्यावर कमेंट केली आहे. काही गैरसमजुतींमुळे अर्जुन आणि मलायका एकमेकांशी बोलत नसल्याच्या चर्चा होत्या. मात्र या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं या फोटोंमधून आणि त्यावरील कॅप्शनवरून स्पष्ट होत आहे. (Arjun Kapoor & Malaika's Answer To Rumours About Break Up)

'अशा अफवांसाठी जागाच नाही. सुरक्षित रहा, खुश रहा, लोकांसाठी चांगलाच विचार करा, तुम्हा सर्वांना प्रेम', असं कॅप्शन अर्जुनने या सेल्फीला दिलं आहे. त्यावर इतर अनेक सेलिब्रिटींनी आणि नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला असून मलायकाच्या कमेंटने विशेष लक्ष वेधलं आहे. मलायकाने हृदयाचा इमोजी कमेंट बॉक्समध्ये पोस्ट केला आहे.

हेही वाचा: लातूरच्या बाभळगावमधील रितेशचा 'जिगरी दोस्त'! अनेक वर्षं उलटली पण..

मलायका आणि अर्जुन हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सुरुवातीला दोघांनीही रिलेशनशिपबद्दल बोलणं टाळलं होतं. मात्र अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानंतर या दोघांनीही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावली. इतकंच नव्हे तर मुलाखतींमध्ये दोघांच्या त्यांच्या वयामधील अंतराबद्दलही प्रश्न विचारला असता त्याचं मोकळेपणाने त्यांनी उत्तर दिलं. त्याचप्रमाणे इतक्यात लग्नाचा विचार नसल्याचं दोघांनी स्पष्ट केलं.

एका मुलाखतीत अर्जुनला विचारण्यात आलं होतं की, 'तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या तसंच घटस्फोट झालेल्या आणि एका मुलाची आई असलेल्या मलायकासोबत रिलेशनशिपमध्ये येताना तू काय विचार केला होतास?' या प्रश्नाला अर्जुनने उत्तर दिलं, 'मी आमच्या दोघांमध्ये एक आदरयुक्त सीमा ठेवली आहे. तिला जे आवडतं ते ती करते आणि तेच मी करतो. माझ्या मलायकासोबतच्या रिलेशनशिपचा परिणाम मी कधीच करिअरवर होऊ देणार नाही. त्यामुळे करिअरसाठी मला काही मर्यादा सांभाळाव्या लागतात. मी याबद्दल आज बोलत आहे कारण मला या नात्याबद्दल आदर आहे. आम्ही एकमेकांना वेळ देत आहोत. मी मलायकाला तिच्या आयुष्यात स्पेस देतो.'

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top