Article 370 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘आर्टिकल 370’ ची बंपर ओपनिंग! रिलीजच्या पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

Article 370: 'आर्टिकल 370' या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली? जाणून घेऊयात...
Article 370
Article 370esakal

Article 370 Box Office Collection Day 1: अभिनेत्री यामी गौतमचा (Yami Gautam) 'आर्टिकल 370' (Article 370) हा चित्रपट काल (23 फेब्रुवारी) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेक जण या चित्रपट रिलीज होण्याची वाट बघत आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी पीएम नरेंद्र मोदींनीही या चित्रपटाचं कौतुक केलं होतं, त्यानंतर 'आर्टिकल 370' हा चित्रपट अधिक चर्चेत आला. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'आर्टिकल 370' या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली? जाणून घेऊयात...

'आर्टिकल 370' या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन (Article 370 Box Office Collection Day 1)

'आर्टिकल 370' हा चित्रपट घटनेतील कलम 370 हटवणे आणि काश्मीरमधील दहशतवाद या विषयावर आधारित आहे. या चित्रपटानं रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

Sacnilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार,'आर्टिकल 370' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 5.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

द कश्मीर फाईल्सला 'आर्टिकल 370'नं टाकलं मागे

'आर्टिकल 370' या चित्रपटानं विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या ओपनिंग डे रेकॉर्ड मोडला आहे. द कश्मीर फाइल्स या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 3.55 कोटींची कमाई केली होती.

Article 370
Article 370 Twitter Review : 'द काश्मिर फाईल्स' नंतर आता 'आर्टिकल ३७०', प्रेक्षकांनी एका शब्दांत सांगून टाकलं...!

'आर्टिकल 370' चित्रपटाची स्टार कास्ट

अरुण गोविल, प्रियामणी, किरण करमरकर यांच्यासह अनेक कलाकारांनी 'आर्टिकल 370' या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अरुण गोविल या चित्रपटात पीएम मोदींच्या भूमिकेत दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com