Arun Govil: अरुण गोविल यांना मिळालं प्रतिष्ठापणेचं निमंत्रण! रामाच्या भूमिकेनं केलं होतं जनतेवर गारुड

राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचं निमंत्रण मिळाल्यानं त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
Arun Govil
Arun Govil

नवी दिल्ली : दुरदर्शनवरील रामायण मालिका ज्यामुळं श्रीराम घराघरात पोहोचले यात रामाची भूमिका साकारलेले कलाकार अरुण गोविल यांना रामलल्लाच्या प्रतिष्ठापणेचं निमंत्रण देण्यात आलं आहे. निमंत्रण मिळाल्यानंतर गोविल यांनी आनंद व्यक्त केला असून आपल्या भावनाही कथन केल्या आहेत. (Arun Govil got an invitation for Pratishthapana of Ramlalla had famous for performed role of Lord Rama in Ramayana of Doordarshan)

Arun Govil
Himayat Beg : पुण्यातली जर्मन बेकरी स्फोट प्रकरणी जन्मठेप भोगणाऱ्या हिमायत बेगला जामीन मंजूर; काय आहे प्रकरण जाणून घ्या

गोविलांनी व्यक्त केला आनंद

अरुण गोविल यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, श्रीराम सर्व विश्वाचे आहेत अन् सारं विश्व श्रीरामाचं आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण मिळणं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. ही निमंत्रण पत्रिका तुमच्यासाठी शेअर करतो आहे. माझ्याप्रती तुम्हा सर्वांच्या सदिच्छा आणि भावनांनीच मला या क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी प्रदान केली आहे. (Marathi Tajya Batmya)

Arun Govil
Fadnavis on Sharad Mohol: "कुख्यात गुंड कोणीही असो, बंदोबस्त करावा लागतो"; मोहोळ गोळीबार प्रकरणावर फडणवीसांचं विधान

इक्बाल अन्सारींना निमंत्रण

दरम्यान, आजच अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रकरणाच्या खटल्यात मुस्लिमांच्या बाजूनं पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांना देखील राम मंदिराच्या उद्घाटनं सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्यावतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी अन्सारी यांच्या घरी जाऊन त्यांना निमंत्रण पत्रिका दिली. (Latest Marathi News)

Arun Govil
Iqbal Ansari: अयोध्या खटल्यातील पक्षकार इक्बाल अन्सारींना मिळालं घरपोच निमंत्रण; सल्ला देताना म्हणाले...

मंदिर उद्घाटनादिवशी दिवाळी साजरी करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी अयोध्येला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. यावेळी कार्यक्रमातून संपूर्ण देशवासियांना संबोधित करताना त्यांनी २२ जानेवारी घरोघरी रामज्योत पेटवून दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com