Arun Govil New Role: रामायणातील राम पुन्हा 'देव' रुपात! अरुण गोविल यांनी 'हा' सिनेमा केला साइन

लोकप्रिय स्टार अरुण गोविल पुन्हा एकदा पडद्यावर देवाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहेत. आदित्य ओम यांच्या चित्रपटात अरुण गोविल भगवान विठ्ठलाची भूमिका साकारतांना दिसणार आहेत.
Arun Govil New Role
Arun Govil New Role Esakal

टीव्हीवरील महाकाव्य म्हणून 'रामायण'ची आजही ओळख आहे. त्याला आजही तितकच पवित्र आणि आवडीने पाहिलं जातं. या मालिकेत रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांची कोणतीही वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही.

त्यांनी या मालिकेत रामाची भुमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान मिळवले आहे. त्यांना आजही त्याच्या चाहत्यांकडून भरपूर प्रेम आणि सन्मान मिळतो.

Arun Govil New Role
Mahhi Vij: माहीच्या लेकीला नमाज अदा करतांना पाहून नेटकरी संतापले! तिनंही दिलं सडेतोड उत्तर..

ते आजही कुठेही गेले तरी लोक त्यांची श्रीरामप्रमाणे त्यांची पूजा करतात. त्याच्या पाया पडतात. त्यानंतर त्यांनी इतर कोणतीही धार्मिक भुमिका साकारली नाही. चाहते त्यांना पुन्हा देवाच्या भुमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता मात्र चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे.

लोकप्रिय स्टार अरुण गोविल पुन्हा एकदा पडद्यावर देवाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहेत. आदित्य ओम यांच्या चित्रपटात अरुण गोविल भगवान विठ्ठलाची भूमिका साकारतांना दिसणार आहेत. हा चित्रपट संत तुकारामांच्या जीवनावर आधारित आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अरुण गोविल यांनी सांगितले की, त्याची भूमिका एका वेगळ्या रूपात दिसणार आहेत. 'रामायण' या चित्रपटात रामाची भुमिका साकारल्यानंतर त्यांना अनेक धार्मिक भूमिका साकारण्यासाठी ऑफर आल्या होत्या. मात्र त्या करण्यास ते तयार नव्हते. यावेळी त्यांनी ही भुमिका स्विकारली त्याला कारण होते ते संत तुकाराम..

Arun Govil New Role
Kangana Ranaut Javed Akhtar Dispute: कंगना राणौतला कोर्टाचा दणका! जावेद अख्तर याच्याबाबतचा खटला फेटाळला...

त्याच्या या चित्रपटातील भुमिकेबद्दल सांगतांना ते म्हणाले की, या चित्रपटात ते देवाची भुमिका साकारणार आहेत मात्र ते देवाच्या रुपात दिसणार आहे.

संत तुकारामांच्या आयुष्यात येणाऱ्या एका सामान्य माणसाच्या भूमिकेत ते दिसतील. मात्र जरी ते सामान्य माणसाप्रमाणे दिसत असले तरी तुम्ही सामान्य नाहीत अशी अनुभूती या भूमिकेत येईल

Arun Govil New Role
Neetu Kapoor Review: माझी गुणी सून! आलियाचा सिनेमा पाहून सासूबाई खुश...

चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य ओम याच्याबद्दल बोलतांना त्यांनी सांगितले की, तो खूप चांगला दिग्दर्शक आहे. त्याबरोबरच तो एक चांगला माणूसही आहे. सेटवर त्याच्यासोबत काम करणं खूप सोप होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com