esakal | 'शाहरुख में पुरा हिंदूस्थान बसता है', किंग खानवरील कविता व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

'शाहरुख में पुरा हिंदूस्थान बसता है', किंग खानवरील कविता व्हायरल

'शाहरुख में पुरा हिंदूस्थान बसता है', किंग खानवरील कविता व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा (bollywood) किंग खान शाहरुख (king khan shahrukh) सध्या मोठ्या गर्तेत सापडला आहे. त्याचे कारण म्हणजे त्याच्या मुलाला आर्यन खानला (aryan khan) ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीनं अटक केली आहे. गेल्या आठवडाभरापासून या प्रकरणानं देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. बॉलीवूडमध्येही या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची सुनावणी अद्याप सुरु असून उद्या याबाबत आणखी महत्वाची घडामोड समोर येणार आहे. दरम्यान शाहरुखला बॉलीवूडमधून मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळाला आहे. अनेक सेलिब्रेटींनी त्याला आपला पाठींबा जाहीर केला आहे. यामध्ये त्याचे फॅन्सही मागे नाही. त्यांनी त्याच्या घराबाहेर उभं राहून त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी शाहरुखची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

आर्यन खान प्रकरणाचे पडसाद सोशल मीडियावरही जोरदार उमटल्याचे दिसून आले. काहींनी शाहरुख आणि आर्यन खान यांना ट्रोल केले. दुसरीकडे कित्येक नेटकऱ्यांनी त्याची बाजू घेत त्याच्याविषयी सहानुभूती व्यक्क केली आहे. अशातच प्रसिद्ध कवी अखिल कटयाल यांची एक कविता व्हायरल झाली आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामध्ये शाहरुखनं आतापर्यत ज्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या त्याचे वर्णन करण्यात आले आहे. एकप्रकारे त्याची इमेज ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न या कवितेतून करण्यात आला आहे. असे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

शाहरुखचा 23 वर्षीय मुलगा आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे सध्या शाहरुख एका वेगळ्या संकटातून जात असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. एनसीबीनं याप्रकरणात खोलात जात चौकशी केली आहे. त्यांनी कोर्टापुढे सादर केलेल्या पुराव्यांमुळे अद्याप आर्यनला जामीन मिळालेला नाही. मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या त्या क्रुझवर एक रेव्ह पार्टी झाली. त्यात अनेकांकडे ड्रग्ज सापडल्याचे सांगण्यात आले. त्यात आर्यनचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. अद्याप या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

अखिल कटयाल यांनी आपल्या कवितेमध्ये म्हटले आहे की, तो कधी आपल्यासाठी राहूल आहे तर कधी राज, कधी चार्ली तर कधी मॅक्स, तो सुरिंदरही आहे आणि हरीपण, देवदास पण तोच आणि वीर अन रामही, कधी मोहन आहे तर कधी कबीरही....अशाप्रकारे शाहरुखच्या भूमिका आणि त्यातील माणुसपण कवीनं त्याच्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख आणि आर्यन खान या प्रकरणाला एक वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

हेही वाचा: Drug case: NCB कडून शाहरुख खानच्या ड्रायव्हरची चौकशी

हेही वाचा: मन्नतच्या बाहेर शाहरुख समर्थकांची गर्दी, सुशांतसिंगचे चाहतेही सहभागी

loading image
go to top