Valentine Day 2023: 'और प्यार हो गया'! सिनेमाच्या सेटवरचं जुळल्या रेशीम गाठी...

आज व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा जोडप्यांची ओळख करून देत आहोत जेचित्रपटाच्या सेटवर भेटले आणि प्रेमात पडले. या जोडप्यांनी आपले नाते लग्नापर्यंत नेले.
Valentine Day 2023
Valentine Day 2023

आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डे चं सेलिब्रेशन सुरु आहे. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत आजचा दिवस सर्वच लोक साजरा करत आहे. आपलं प्रेम व्यक्ती कधीच विसरु शकत नाही. बॉलीवूडने अनेक दशकांपासून सुंदर लव्हस्टोरीज दाखवल्या आहेत. अनेक प्रेमगीतही आहेत,जे आपण अजूनही ऐकत आपला व्हॅलेंटाईन डे साजरा करतो. बॉलिवूडमध्ये अनेकदा ऑनस्क्रीन प्रेमकथा या खऱ्या आयुष्यात प्रेमात बदलल्या आहेत.

अलीकडच्या काळात बॉलिवूडच्या अनेक जोडप्यांनी लग्न करून आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडलेल्या प्रसिद्ध बॉलीवूड जोडप्यांबद्दल तुम्हाला माहित आहे का? चला तर मग पाहूया असे बॉलिवूड कपल ज्यांनी एकत्र काम केल्यानंतर लग्न केलं.

Valentine Day 2023
Valentines Day 2023 : यशवंतराव-वेणूताईंचा संसार म्हणजे ‘दृष्ट लागण्याजोगे सारे’!
अमिताभ- जया बच्चन .. काजोल आणि अजय देवगण
अमिताभ- जया बच्चन .. काजोल आणि अजय देवगण

अमिताभ- जया बच्चन .. काजोल आणि अजय देवगण

रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन या दोघांनी 1970 मध्ये पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पहिल्यांदा एकमेकांना पाहिले पण त्यानंतर त्यांच्यात काहीही झाले नाही. पण दोघेही चित्रपटाच्या सेटवरच प्रेमात पडले. तर काजोल आणि अजय देवगण 1995 मध्ये आलेल्या 'हुलचल' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. चार वर्षांनंतर 1999 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.

Valentine Day 2023
Valentine Day 2023: व्हॅलेंटाईन डे म्हणजे हार्दिक जोशीनं सांगितली मनाला भिडणारी प्रेमाची व्याख्या
जेनेलिया- रितेश देशमुख ..अक्षय कुमार- ट्विंकल खन्ना
जेनेलिया- रितेश देशमुख ..अक्षय कुमार- ट्विंकल खन्ना

जेनेलिया- रितेश देशमुख ..अक्षय कुमार- ट्विंकल खन्ना

जेनेलिया आणि रितेश 2003 च्या तुझे मेरी कसमच्या सेटवर जवळ आले आणि चांगले मित्र बनले. त्यानंतर दोघांनी लग्न केले. तर अक्षय आणि ट्विंकल यांची पहिली भेट फिल्मफेअर मासिकाच्या शूटवर झाली होती आणि अक्षयला ट्विंकलवर क्रश आलं होतं. 1999 मध्ये इंटरनॅशनल खिलाडीच्या शुटिंगदरम्यान दोघांमध्ये प्रेम सुरू झाले. त्यानंतर ते पती-पत्नी झाले.

दीपिका- रणवीर.. आलिया-रणबीर
दीपिका- रणवीर.. आलिया-रणबीर

दीपिका- रणवीर.. आलिया-रणबीर

2013 मध्ये 'गोलियों की रासलीला राम-लीला'च्या सेटवर बॉलिवूड पॉवर कपल दीपिका आणि रणवीरचे प्रेम सुरु झालं. जवळपास सहा वर्षे एकत्र राहिल्यानंतर या जोडप्याने 2018 मध्ये लग्नगाठ बांधली.तर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी पाच वर्षे डेट केले आणि 'ब्रह्मास्त्र'मध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले. एप्रिल 2022 मध्ये त्यांनी लग्न केलं

Valentine Day 2023
Valentines Day 2023 : तुमच्यासाठी काय पण...! ‘व्हॅलेंटाईन डे’साठी तरुणाई सज्ज
ऐश्वर्या-अभिषेक बच्चन..करीना- सैफ अली खान
ऐश्वर्या-अभिषेक बच्चन..करीना- सैफ अली खान

ऐश्वर्या-अभिषेक बच्चन..करीना- सैफ अली खान

मणिरत्नम यांच्या 'गुरु' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्याची अभिषेकशी भेट झाली आणि दोघेही सेटवर प्रेमात पडले. त्यांनी 10 एप्रिल 2007 रोजी लग्न केले आणि 'उमराव जान' आणि 'धूम 2' सारख्या चित्रपटात काम केले. तर 'टशन'च्या सेटवर करिना आणि सैफची भेट झाली. सैफ आणि करीना जवळ आले आणि दोन वर्षे डेट केल्यानंतर 16 ऑक्टोबर 2012 रोजी लग्न झालं.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी
सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी

लव्ह कपल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी 7 फेब्रुवारी रोजी लग्न केले. सिड-कियाराची प्रेमकहाणी त्यांच्या पहिल्या 'शेरशाह' चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com