क्रिकेटर के.एल.राहूलसोबत लग्नाच्या बातम्यांवर आथियानं सोडलं मौन; म्हणाली... Athia Shetty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Athiya Shetty Broke Silence On The News Of Marriage

क्रिकेटर के.एल.राहूलसोबत लग्नाच्या बातम्यांवर आथियानं सोडलं मौन; म्हणाली...

आथिया शेट्टी(Athia Shetty) आणि के.एल.राहूल(K.L.Rahul) काही दिवसांपासून रीलेशनशीपमध्ये आहेत,आणि अर्थात त्यामुळे चर्चेत आहेत. दोघांना गेल्या काही दिवसांपासून एकत्र अनेकदा स्पॉट केलं गेलं. इतकंच नाही तर के.एल,राहूलच्या प्रत्येक मॅच प्रसंगी आथिया त्याला पाठिंबा देताना,चिअर करताना दिसली आहे. गेल्या आठवड्यापासून अचानक त्यांच्या लग्नाची बातमी आली आणि व्हायरल झाली. जो-तो यांच्या लग्नाच्या बातमीवर चर्चा रंगवताना दिसला. या बातमीवर काही दिवस आधी आथियाच्या भावाची प्रतिक्रिया आली होती. आता आथियानं स्वतः यावर प्रतिक्रिया दिली आहे. बातमी होती की आथिया शेट्टी आणि के.एल.राहूल डिसेंबरमध्ये लग्न करीत आहेत आणि बान्द्र्यात दोघांनी एक आलिशान घर घेतलं आहे. ज्या घरात ते लग्नानंतर शिफ्ट होणार आहेत.

हेही वाचा: Video: सोनमला लागले गोड खाण्याचे डोहाळे; हॉटेलमध्ये जाऊन स्वतः बनवलं डेझर्ट

आथियानं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरनं सांगितंल आहे की,''मी सध्या कोणासोबतही कुठेच शिफ्ट होणार नाही. हो,पण मी माझ्या कुटुंबासोबत नवीन घरात रहायला जात आहे''. सध्या आथिया आपल्या कुटुंबासोबत दक्षिण मुंबईत राहत आहे. त्यानंतर लग्नाविषयी पसरलेल्या बातम्यांवर आथिया म्हणाली,''मी या प्रश्नांचं काहीच उत्तर देणार नाही. मला आता कंटाळा आलाय या अशा प्रश्नांचा,कितीतरी वेळा तर मला हसायला येत यावर. लोकांना सध्या जो विचार करायचा आहे तसा ते करू शकतात''.

हेही वाचा: अमिताभ यांच्या 'जलसा' बंगल्यातील प्रत्येक कोपरा बोलका; पहा Inside Photos

आथियाचा भाऊ अभिनेता अहान शेट्टीनं एका मुलाखतीत तिच्या लग्नांच्या बातम्यांवर म्हटलं होतं,''असं काहीच नाही आहे. या सगळ्या अफवा आहेत. जर लग्नच होणार नाही तर लग्नाची तारीख कशी सांगू? साखरपुडा देखील झालेला नाही. आथियाच्या लग्नाविषयी सध्या काहीच प्लॅनिंग नाही आहे. आणि अजून काही महिने याचा विचार आमच्या कुणाच्या मनात नाही''.

हेही वाचा: 'केजीएफ चॅप्टर 2' मधील 'या' अभिनेत्याचं निधन

आथिया आणि के.एल.राहूल कधीच अशा बातम्यांवर प्रतिक्रिया देत नाहीत. पण जेव्हा अहान शेट्टीच्या 'तडप' सिनेमाच्या प्रीमियरला के.एल.राहूल आला तेव्हा त्यानं या नात्याला एका अर्थाने अधिकृत केल्याची सूचना दिली होती. आथिया शेवटची २०१९ मध्ये 'मोतीचूर चकनाचूर' सिनेमात नवाझुद्दिन सिद्दिकीसोबत दिसली होती. सध्या ती एका नव्या प्रोजेक्टवर काम करीत आहे ज्याविषयी कदाचित ती लवकरच घोषणा करू शकते.

Web Title: Athiya Shetty Broke Silence On The News Of Marriage With Kl Rahul Know What She

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top