Athiya Shetty: बायको असावी अशी! के एल राहुलची अथिया शेट्टी कडून पाठराखण; 'स्ट्रिप क्लब' प्रकरणावर भडकली!

'स्ट्रिप क्लब' वरूनट्रोल करणाऱ्यांना अथिया शेट्टीनं घेतला समाचार.. Athiya Shetty clarifies on alleged strip club visit with KL Rahul
Athiya Shetty clarifies on alleged strip club visit with KL Rahul
Athiya Shetty clarifies on alleged strip club visit with KL Rahulsakal

Athiya Shetty: सुनील शेट्टी यांची लेक अभिनेत्री अथिया शेट्टी हीनं क्रिकेटर के एल राहुल याच्यासोबत २३ जानेवारी रोजी लग्नगाठ बांधली. हा लग्न सोहळा बॉलीवुडमधील एक चर्चेत राहिलेला लग्न सोहळा मानला गेला.

पण लग्नाला काही महीने उलटताच अथिया आणि राहुल अडचणीत आले आहेत. अथिया शेट्टीचा नवरा के एल राहुल एका स्ट्रिप क्लब मध्ये गेल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यावर त्याला बरेच ट्रोल केले गेले. पण अखेर बायकोनेच नवऱ्याची बाजू घेत, ट्रॉलर्सला खडेबोल सुनावले आहेत.

अथियाने यासंदर्भात एक स्टोरी पोस्ट केली आहे, जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

(Athiya Shetty clarifies on alleged strip club visit with KL Rahul)

Athiya Shetty clarifies on alleged strip club visit with KL Rahul
Veer Savarkar Jayanti: विरोधकांच्या टिकेला हेच खरं उत्तर असेल.. सावरकरांचे नातू भडकले..

झाले असे की, केएल राहुल सध्या इंग्लंडमध्ये आहे. काही आठवड्यांपूर्वी 'IPL 2023' च्या सामन्यादरम्यान त्याच्या मांडीला दुखापत नाही आणि त्याची तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. पण असे असतानाच लंडनमधील एका क्लबमध्ये केएल राहुलला दिसल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला.

विशेष म्हणजे तो आणि अथिया एका स्ट्रिप क्लबमध्ये दिसल्याचा दावा अनेक बातम्यांमध्ये केला गेला. त्यामुळे याची विशेष चर्चा झाली. मॅच सोडून हा बायकोसोबत मजा करतोय अशा टीका त्याच्यावर आल्या. अखेर या सगळ्या आरोपांवर अथियानेच आपले परखत मत व्यक्त केले आहे.

Athiya Shetty clarifies on alleged strip club visit with KL Rahul
Gaurav More: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेनं घेतला ब्रेक; कारण आलं समोर..

अथिया शेट्टीने एक पोस्ट करत लिहिले आहे की, '' मी सहसा कायम गप्प राहणे पसंत करते आणि कोणत्याही मुद्द्यावर प्रतिक्रिया देत नाही, पण कधीकधी स्वतःसाठी उभं राहावंच लागतं. राहुल, मी आणि आमचे मित्र आम्ही अशा ठिकाणी गेलो होतो जिथे सर्वसामान्य लोक जातात. त्यामुळे कुणीही चुकीचे संदर्भ जोडून नको ते निष्कर्ष काढणं थांबवा..'' असं ती म्हणाली आहे.

व्हिडिओ मध्ये नेमकं काय होतं?

व्हिडिओमध्ये केएल राहुल एका क्लबमध्ये अथियासोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे. शिवाय एक विदेशी नृत्यांगना तोकड्याकपड्यात त्यांच्या पुढ्यात डान्स करत आहे तर के एल राहुलही गाण्यांवर थीरकत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी राहुलला बरेच ट्रोल केले.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com