Athiya Wedding Dress : या अभिनेत्रींचा स्पेशल डिझायनर बनवणार अथियाचा वेडिंग ड्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Athiya Wedding Dress

Athiya Wedding Dress : या अभिनेत्रींचा स्पेशल डिझायनर बनवणार अथियाचा वेडिंग ड्रेस

Athiya Wedding Dress : भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. बऱ्याच कालावधीपासून त्यांच्या लग्नांच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांवर त्या दोघांनी मौन बाळगलं होतं. अखेर आता त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

हेही वाचा: Aloo Methi Bhaji Recipe : मुलं पालेभाज्या खात नाहीयेत? मग या पद्धतीने ट्राय करा बटाटा मेथी भजी रेसिपी

पिंकविलाच्या रिपोर्ट्सनुसार, दोघेही 21 जानेवारीला साऊथ इंडियन स्टाईलमध्ये लग्न करतील. पिंकविलाला क्रिकेटरच्या एका जवळच्या मित्राने सांगितलं की, या जोडप्याच्या लग्नाचे आमंत्रण डिसेंबरच्या शेवटच्या दिवसांत दिले जाईल. 21 ते 23 डिसेंबर दरम्यान त्यांचे लग्न होणार आहे. फार कमी वेळ शिल्लक असल्याने तयारी सुरू झाली आहे. आता लग्न म्हटल्यावर महागडा ड्रेस आलाच. तर बॉलिवूडचा नामांकित डिझायनर अथियाचा वेडिंग ड्रेस डिझाइन करणार असल्याचं बोललं जातंय.

हेही वाचा: Cucumber Thalipeeth Recipe : बनवा खूशखुशीत,खमंग अन् हेल्दी काकडीचे थालीपीठ

उर्मिला मातोंडकर : बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिलानेही तिच्या लग्नात मनीष मल्होत्राचा डिझाईन केलेला लेहेंगा परिधान केला होता. असं म्हटलं जातं की लाल रंगाच्या या साडी लेहेंग्याची किंमत सुमारे 4.50 लाख रुपये होती. याशिवाय तिने तिच्या रिसेप्शनसाठी मनीषने डिझाइन केलेला रिसेप्शन आउटफिटही घातला होता.

हेही वाचा: Holiday Calendar 2023 : पुढचं वर्ष खाणार सगळ्या सुट्ट्या; वीकेंडलाच आले आहेत सगळे सण

प्रीती झिंटा : बॉलीवूडची डिंपल गर्ल प्रीती झिंटाने मुंबईतील रिसेप्शन पार्टीत मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला लाल गाऊन परिधान केला होता. यावेळी प्रीतीने तिचे केस मोकळे ठेवले होते आणि मिनीमल मेकअप केला होता.

हेही वाचा: Palazzo Fashion : रेग्युलर प्लाजो वर अशा टॉप्सने क्रिएट करा वेस्टर्न लुक

जेनेलिया डिसूजा : बॉलिवूडची क्युट हिरोईन जेनेलियाने तिच्या संगीतामध्ये मनीषचा डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता. जेनेलिया पांढऱ्या लेहेंग्यात एकदम सौंदर्याच्या देवतेप्रमाणे दिसत होती.

हेही वाचा: Mens Short Kurta Fashion : तरूणांनो तीच स्टाइल करून कंटाळलात? शर्ट्समध्ये आलाय हा नवा ट्रेंड

गौहर खान : एक्ट्रेस गौहरने जैद दरबार सोबत 2020 लग्न केलं. या कपलने त्यांच्या लग्नात मनीष मल्होत्रान डिजाइन केलेले आउटफिट परिधान केले होते. गौहरच्या लेहेंग्यात वेलवेटच फॅब्रिक वापरलं होतं, तिच्या हातात गोल्डन हँडबॅग होती.