Atithi Bhooto Bhava : ‘अतिथी भूतो भव’चा ट्रेलर रिलीज; हॉरर कॉमेडी चित्रपट

हार्दिक गज्जर दिग्दर्शित हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे
Atithi Bhooto Bhava Trailer Released
Atithi Bhooto Bhava Trailer ReleasedAtithi Bhooto Bhava Trailer Released
Updated on

Atithi Bhooto Bhava Trailer Released ओटीटीची वाढती लोकप्रियता पाहून निर्माते चाहत्यांसाठी रोज काहीतरी ऑफर करीत असतात. आता थेट ओटीटीवर चित्रपटही प्रदर्शित होत आहेत. याच क्रमाने आता आणखी एक चित्रपट ओटीटीवर दार ठोठावण्याच्या तयारीत आहे. नुकताच ‘अतिथी भूतो भव’चा (Atithi Bhooto Bhava ) ट्रेलर प्रदर्शित (Trailer Released) झाला आहे. या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

हार्दिक गज्जर दिग्दर्शित हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. ज्याची कथा इतर हिंदी चित्रपटांपेक्षा खूप वेगळी आणि मनोरंजक असणार आहे. प्रतीक या चित्रपटात श्रीकांत शिरोडकर नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर प्रतीक उपाख्य ​​श्रीकांतला एक भूत भेटतो. जो दावा करतो की तो मागील जन्मी श्रीकांतचा नातू होता. चित्रपटात जॉकी श्रॉफ (Jackie Shroff), शर्मीन सेगल आणि दिविना ठाकूर हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Atithi Bhooto Bhava Trailer Released
PM Narendra Modi Birthday : ‘या’ कलाकारांनी साकारली पंतप्रधानांची भूमिका

‘मी अनेक मोठ्या भूमिका केल्या आहेत. परंतु, अति भूतो भवमधील माखन सिंगची भूमिका वेगळी आहे. भूतचे चित्रण करणे खूप रोमांचक होते. मला आशा आहे की प्रेक्षकांनाही तेवढाच आनंद मिळेल जितका आम्हाला तो बनवताना आला’ असे चित्रपटाविषयी बोलताना अभिनेता जॉकी श्रॉफ म्हणाले.

‘अतिथी भूतो भव हा एक मनोरंजक आणि भावनांनी भरलेला चित्रपट आहे. कथानकाची वेगळी मांडणी असल्याने स्क्रिप्टकडे झुकलो होतो. अतिथी भूतो भव हा एक हलकाफुलका रोमँटिक संगीतमय चित्रपट आहे. जो प्रेक्षकांना जोडून ठेवेल’ असे प्रतीक गांधी म्हणाला.

Atithi Bhooto Bhava Trailer Released
Defamation Suit : जॉनी डेप, अ‍ॅम्बर हर्डवर चित्रपट; ३० सप्टेंबरला होणार प्रदर्शित

चित्रपटाचे दिग्दर्शक हार्दिक गज्जर म्हणाले, अतिथी भूतो भव खरोखर माझ्या हृदयाच्या जवळ आहे. हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. आपले विचार व्यक्त करण्यासाठी असंख्य व्यासपीठे आहेत. तेव्हा आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्याची गरज आहे. व्यक्त करणे कठीण होत आहे. प्रेमाची शक्ती जीवन आणि मृत्यूच्या पलीकडे असते. यावर हा चित्रपट प्रकाश टाकतो. हा चित्रपट २३ सप्टेंबरपासून OTT प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com