ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरनं केली 'पुष्पा'ची नक्कल

चाहत्यांनी केलं नवीन नामकरणं; म्हणाले,''हा तर पुष्पा वॉर्नर''
Australian Cricketer David Warner &Allu Arjun from 'Pushpa'
Australian Cricketer David Warner &Allu Arjun from 'Pushpa'Google

अल्लू अर्जूनचा(Allu Arjun) 'पुष्पा द राइज' प्रदर्शित होऊन अनेक दिवस झाले तरी त्या सिनेमाची,त्यातील अल्लू अर्जुनच्या स्टाईलची क्रेझ काही कमी होत नाही. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर तर यातील डायलॉग्ज आणि गाण्यांच्या व्हिडीओ रीलचा तर नुसता पाऊस पडत आहे. अल्लू अर्जुनची या सिनेमातील रावडी स्टाईल,त्याचं चालणं हे सारंच प्रेक्षकांनी उचलून धरलंय. तर मग याची भुरळ बॉलीवूडप्रेमी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपट्टू डेव्हि़ड वॉर्नरला(David Warner) कशी नाही पडणार. त्यानं नुकताच 'पुष्पा द राइज' सिनेमातील अल्लू अर्जूनच्या चालण्याची स्टाईल आणि एकंदरीत त्याच्या अंदाजाची नक्कल केलेला व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्याला काही तासातच हजारोंनी व्ह्यूज मिळाले आहेत.

डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियन खेळाडू. त्याच्या चांगल्या खेळीनं त्यानं अनेकदा संघाला विजय मिळवून देण्यात सहकार्य केलंय. पण तो आयपीएल मध्येही 'हैदराबाद सनराईजर्स' संघातर्फे खेळला असल्या कारणाने भारतातही त्याचं फॅनफॉलॉइंग जबरदस्त आहे. तो बॉलीवूडचा जबरद्स्त फॅन आहे. अनेकदा बॉलीवूडच्या गाण्यांवर डान्स करतानाचे व्हिडीओ तो शेअर करीत असतो. इतकंच काय तर त्याची फॅमिलीही त्याच्यासोबत या गाण्यांवर डान्स करते. पुष्पाची नक्कल करणारा व्हिडीओ त्यानं शेअर केला अनं त्याला कॅप्शन दिलं 'पुष्पा व्हॉट नेक्स्ट?' त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी म्हणालं,''अरे हा तर पुष्पा वॉर्नर'' तर कुणी म्हणालं,''तू या जगातला सगळ्यात चांगला कलाकार आहेस''तर कुणी म्हणालं'',या सिनेमातील सामी गाण्यावर तुझ्या पत्नीसोबत डान्स केलेला व्हिडीओ कधी पोस्ट करणार?''...काहीही असो 'पुष्पा' ने भल्याभल्यांना नाचवलं हे मात्र खरंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com