
Brahmastra मधील 'केसरिया' गाण्याला ट्रोल करणाऱ्यांवर दिग्दर्शकाचा पलटवार
अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा(Alia Bhatt) 'ब्रह्मास्त्र'(Brahmastra) सिनेमा सप्टेंबर महिन्यात रिलीज होत आहे. दोघंही या सिनेमाला घेऊन भलतेच उत्सुक आहेत. खरंतर आलिया भट्ट आता गरोदर आहे पण ती प्रयत्नात आहे की घरी बसल्या बसल्या देखील ती कसं 'ब्रह्मास्त्रचं प्रमोशन करु शकेल. पण या सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी(Ayan Mukerji) मात्र सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुलाखतींवर मुलाखती देत सुटला आहे. (Ayan Mukerji hits back at trollers, says ‘Love Stories’ Biryani has salt in sugar, not cardamom)
हेही वाचा: 'एकेकाला संपवून टाकीन जर...' जान्हवी कपूरनं दिली धमकी,चर्चेला उधाण
काही दिवसांपूर्वीच सिनेमातलं एक गाणं रिलीज झालं,ज्याचं टायटल आहे 'केसरिया'. केसरिया गाणं रिलीज झालं आणि ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलं आहे. या गाण्यांच्या शब्दांना घेऊन जोरदार मीम्स व्हायरल होत आहेत. गाण्यात एक ओळ आहे,ज्यात 'लव स्टोरियां..' असं म्हटलं गेलंय,ज्याची खिल्ली उडवली जात आहे. आता दिग्दर्शक अयान मुखर्जीनं यावर पलटवार करत प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा: NCB नं क्लीन चीट दिल्यावर आर्यन खानचा क्लबमधील 'तो' Video Viral, चर्चा सुरू
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक अयान मुखर्जीला या 'लव स्टोरिया' ओळीविषयी विचारलं गेलं,तेव्हा तो म्हणाला, ''त्याने या ओळीला खूप प्रेमाने ठेवलं आहे,कारण ते त्याला खूप भावून गेलं. अयानच्या म्हणण्यानुसार बिर्यानीमध्ये वेलचीसारखं नाही तर,साखरेत एखाद्या लहानश्या मिठाच्या खड्यासारखं ते आलं आहे. त्याचा आपलाच असा एक स्वाद आहे''.
हेही वाचा: हिंदी भाषिक राज्यात का चालतायत साऊथचे सिनेमे? किच्चा सुदीप स्पष्टच बोलला..
पुढे दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाला,''हा एक मॉर्डर्न सिनेमा आहे आणि यातील गाण्याचे शब्द खूप साधे-सोपे आहेत,जे खूप छान पद्धतीनं सिनेमात येतात. अयान हे देखील म्हणाला की लोक काही दिवसांनी हे गाणं गुणगुणायला लागतील,या गाण्याचा अधिक आनंद घेतील''.
हेही वाचा: Sushmita Sen ने भावाला इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो, आता राजीव सेन म्हणतोय...
अयानच्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच चर्चेत आला. याच्यावर खूपजणांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'अयान जर तू ही प्रतिक्रिया वाचत असशील तर प्लीज तुझी दुसरी गाणी तरी एकदा चेक कर,त्यातल्या चुका आधीच सुधार'. तर दुसऱ्या एकानं लिहिलं आहे,'आता अयान आपलं गाणं रिलीज करण्याआधी त्याच्यावरील स्पष्टिकरणाचे व्हिडीओ तयार करुन पोस्ट करायला सुरुवात करेल'.
हेही वाचा: कोण आहे मिथिला पालकरचा गोल्डन बॉय?
ब्रह्मास्त्र या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदा रणबीर आणि आलिया सिल्व्हर स्क्रिनवर एकत्र दिसणार आहेत. सिनेमात अमिताभ बच्चन,नागार्जुन,मौनी रॉय हे देखील रणबीर-आलिया सोबत मुख्य कलाकार म्हणून दिसणार आहेत. हा सिनेमा ९ सप्टेंबर,२०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.
Web Title: Ayan Mukerji Hits Back At Trollers Says Love Stories Biryani Has Salt In Sugar Not
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..