आयुषमानने चंदीगडमध्ये घेतले आलिशान घर आणि घेतला चित्रीकरणात सहभाग

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 8 July 2020

खुराणा कुटुंब बऱ्याच दिवसांपासून एक मोठे घर शोधत होते, ज्यामध्ये संपूर्ण खुराना कुटुंब एकत्र राहू शकेल. आयुषमान आणि अपारशक्ती या दोघांचीही लग्ने झाली आहेत.

मुंबई : सध्या स्वतंत्र कुटुंब पद्धतीचे प्रमाण खूप वाढत चाललेले आहे. प्रत्येकाला स्वतःचे घर हवे आहे. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू लोप पावत चाललेली आहे. अशाही परिस्थितीत कुटुंबाने एकत्र राहावे असा विचार आयुषमानने केला. कारण एकत्र कुटुंबाची मजा काही वेगळीच असते. त्यामुळे आयुषमान आणि त्याच्या कुटुंबाने चंदीगड येथील पंचकुलामध्ये आलिशान घर घेतले आहे. 

लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम; ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट...

खुराणा कुटुंब बऱ्याच दिवसांपासून एक मोठे घर शोधत होते, ज्यामध्ये संपूर्ण खुराना कुटुंब एकत्र राहू शकेल. आयुषमान आणि अपारशक्ती या दोघांचीही लग्ने झाली आहेत. याशिवाय आयुष्मान आणि ताहिरा यांना दोन मुलेही आहेत. त्यामुळे एकत्र राहण्यासाठी मोठ्या जागेची त्यांना आवश्यकता होती. त्याकरिता मोठी गुंतवणूक करणे शहाणपणाचे होते. त्यांनी नुकतीच ही मालमत्ता खरेदी केली आहे आणि त्यात रहायला येण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागेल. सध्या लॉकडाऊनमध्ये आयुष्मान आणि अपारशक्ती त्यांच्या कुटुंबासोबत चंदीगडमध्ये आहेत. 

ठाणे पालिकेने कोरोना नियंत्रणासाठी कसली कंबर! ॲानलाईन बेड अलोकेशन सिस्टम वेबलिंक सुरू

आता घर खरेदी संबंधी सर्व कायदेशीर कामे पूर्ण करता येत आहेत. आयुषमान खुरानाने ही बातमी शेअर करताना लिहिले,  "खुराना कुटुंबाला एक कुटुंब घर सापडले आहे. आम्ही आमच्या या नवीन घरी नवीन आनंदी क्षण जगायला उत्सुक आहोत." तसेच आयुषमानने चंदीगडमध्ये एका जाहिरातीचे शूटिंग सुरू केले आहे. तो म्हणाला, की हळूहळू का होईना आता सुरुवात करायला हवी. इतक्या महिन्यांनंतर चित्रीकरणात भाग घेताना नक्कीच आनंद होत आहे. कॅमेऱ्याचा सामना करताना खूप मजा आली. आता सगळं लवकरच पूर्ववत होईल आणि आपण सगळे सर्व सुरक्षा उपायांसह बाहेर पडू अशी आशा आहे. चंदीगडमध्ये काम करताना मजा आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayushaman khyranna purchase new home in chadigarh and starts shooting