India vs Pak: भारत आणि पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चक्क विमानाचं उड्डाणच लाबंवलं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Pak
Ayushmann Khurrana

India vs Pak: भारत आणि पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चक्क विमानाचं उड्डाणच लाबंवलं...

भारतीयांचा क्रिकेटची फिवर तर सर्वश्रुत आहे. त्यातच भारत पाकिस्तान सामना असला तर काही विषयचं नाही. सर्व सामन्यांपासून बॉलिवूड स्टार्स पर्यंन्त सर्वांनाच याची भुरळ पडते. त्यातच कालचा सामना तर वेगळ्याचं लेव्हलचा होता. विराटने आपल्या विराट खेळीने मॅचला वेगळंच वळण दिलं. या सामन्याची चर्चा रंगत असतांना आयुष्मान खुरानाने केलल्या ट्विटने वेगळीच चर्चा रंगली आहे.

भारताच्या दणदणीत विजयानंतर आयुष्माने ट्विट करत म्हटंल ,'ही गोष्ट माझ्या पुढच्या पिढ्यांना मला सांगता येईल. मी भारत पाकिस्तान सामन्यातील शेवटची दोन षटकं मुंबई-चंदीगढ विमानामध्ये पाहिली. विमानाचे उड्डाण होण्याच्या काही मिनिटं आधी सर्व प्रवासी त्यांच्या मोबाईलला चिकटून होती मला खात्री आहे की क्रिकेट वेड्या पायलटने जाणूनबुजून फ्लाइटला 5 मिनिटे उशीर केला आणि त्याबद्दल कोणीही तक्रार केली नाही'.

 त्यांच्या दुसऱ्या ट्वीटमध्ये आयुष्मानने म्हटलं आहे की,'पंड्या आणि दिनेश कार्तिक आउट झाले. त्यानंतर अश्विन फलंदाजीसाठी आला. त्याने आरामात वाईड बॉल सोडून दिला. अंतिम धाव त्यानेच घेतली. मी यापूर्वी कधीच विमानामध्ये अशाप्रकारचा एकाच वेळी केलेला जल्लोष पाहिला नाहीय. आमचं विमान रनवेवर असतानाच हे सगळं घडलं  घडलं. वैमानिकानेही उत्तम टायमिंग साधलं,'

'मला असं वाटंतय जर मी हे रेकॉर्ड करु शकलो असतो तर किती छान झालं असतं पण मला हे नक्की मान्य करावं लागेल की सार्वजनिकरित्या  अशा गोष्टी करायला मला अवघडल्यासारखं होतं. मला तो क्षणही जगायचा होता. विराट कोहली आणि भारतीय संघाचे मी आभार मानतो त्यांनी एक दिवस आधीच देशाला दिवाळी साजरी करण्याची संधी दिली,” असंही त्यांन त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे'.

प्रत्येक क्रिकेटप्रेमी आयुष्मान खुरानाच्या शब्दांशी सहमत असेलं. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील टी-20 विश्वचषक सामन्याच्या शेवटच्या क्षणी सर्व काही थांबल्यासारखे वाटत होते.मॅच हातातून गेली असं वाटताच  विराट कोहलीच्या बॅटने कमाल केली. अप्रतिम खेळी खेळत त्याने 82 धावा घेतल्या आणि भारताला स्वबळावर सामना जिंकून दिला. त्याच्यांवर अनेक बॉलिवूड स्टारर्सने शुभेच्छा दिल्यात मात्र आयूष्यमान टाकलेल्या  ट्विटची वेगळीचं चर्चा आहे.

आयुष्मान खुरानाच्या कामाबद्दल बोलायचे झालं तर त्यांचा 'डॉक्टर जी' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. त्याशिवाय तो अनन्या पांडेसोबतच्या 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटातही दिसणार आहे.     

हेही वाचा: IND vs PAK : कोहलीची खेळी, भारताचा विजय; पाकिस्तानवर पैसा लावणारे कंगाल