esakal | आयुषमान खुराना म्हणाला, अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले...
sakal

बोलून बातमी शोधा

ayushman.

अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा 'गुलाबो सिताबो' हा चित्रपट आज अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला. तब्बल दोनशे देशांत तो पाहिला जाणार आहे. एकूण पंधरा भाषांमध्ये तो सब-टायटल्सने प्रदर्शित करण्यात आला आहे.

आयुषमान खुराना म्हणाला, अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई ः अभिनय क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाचं आपण अमिताभ बच्चन यांच्यासारखं बनावं असे स्वप्न असते. मी देखील लहान असताना असाच विचार केला होता. लहान असताना चंदिगडच्या नीलम थिएटर्समध्ये मी 'हम' हा चित्रपट पाहिला. तेव्हा मोठ्या पडद्यावर बिग बींना पाहिले आणि मी कमालीचा प्रभावित झालो. त्याच वेळी माझ्यामध्ये कमालीची ऊर्जा निर्माण झाली. एक प्रकारचा उत्साह मनात आला आणि त्यावेळीच मी ठरविले आपण अभिनेताच व्हायचे आणि आज मी अभिनेता झालो आहे, अशी आठवण आयुषमान खुरानाने सांगितली.

वाचा ः लॉकडाऊनमध्ये एसटीने शोधला उत्पन्नाना नवा मार्ग; 21 लाखांचे मिळाले उत्पन्न

अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा 'गुलाबो सिताबो' हा चित्रपट आज अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला. तब्बल दोनशे देशांत तो पाहिला जाणार आहे. एकूण पंधरा भाषांमध्ये तो सब-टायटल्सने प्रदर्शित करण्यात आला आहे. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराबरोबर आयुषमानने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली आहे. एकेकाळी त्याने अमिताभचे चित्रपट पाहिले आणि तो अभिनेता झाला. त्यानंतर साक्षात त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी त्याला मिळाली. त्यामुळे त्याचा आनंद ओसंडून वाहात आहे. अमिताभ यांच्याबद्दल किती बोलू आणि काय बोलू असे त्याला झाले आहे. कारण त्यांचे स्वप्न आज अमिताभबरोबर काम करून पूर्ण झाले आहे. 

वाचा ः स्थलांतरीत कामगारांचे मुंबईत परतण्यासाठी मालकांना साकडे; वाचा बातमी

तो म्हणतो, की अमिताभ सर...अमिताभ सर...माझे ते प्रेरणास्थान आहेत. चित्रपटसृष्टीमध्ये येणारा प्रत्येक जण त्यांना आपला आदर्श मानतात. कारण ती एक अॅक्टिंगची इन्स्टिट्यूट आहे. त्यांचे चित्रपट पाहूनच मी मोठा झालो आहे. माझे टीव्हीसाठीचे पहिले शूट कुलाबा येथील मुकेश मिलमध्ये होते. तेथेच 'हम' या चित्रपटातील 'जुम्मा चुम्मा' हे गाणे चित्रित झाले होते. त्यावेळी मी मनातल्या मनात म्हणालो होतो की मी आलो आहे तुम्हाला भेटायला...तुमचे आशीर्वाद घ्यायला...त्या दिवशभर चित्रीकरणामध्ये माझी काय अवस्था झाली असेल याचा तुम्हीच विचार करा...आयुषमान आपल्या आठवणींत रमला होता. 

वाचा ः आनंदाची बातमी, मुंबईत तब्बल 'इतक्या' पोलिसांनी केली कोरोनावर मात

आठवणींतून बाहेर येऊन तो म्हणाला, की मी दिग्दर्शक सुजित सरकार यांचा खूप खूप आभारी आहे कारण त्यांच्यामुळेच मला अमिताभ सरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात आमच्या व्यक्तिरेखाही अशा आहेत की सतत आम्ही एकमेकांसमोर उभे ठाकतो. प्रत्यक्षात मी कधीच त्यांच्यासारख्या मोठ्या स्टार्सला असे बोलू शकणार नाही. परंतु एकूणच त्यांच्याबरोबर काम केल्याने मलाही बऱ्याच गोष्टी शिकता आल्या आणि जीवनात धन्य झाल्यासारखे वाटले. कारण अमिताभसारख्या लिजंडबरोबर काम करावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. आता माझे ते पूर्ण झाले आहे.