लॉकडाऊनमध्ये एसटीने शोधला उत्पन्नाना नवा मार्ग; 21 लाखांचे मिळाले उत्पन्न

st parcel van
st parcel van

मुंबई : चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाचे लॉकडाऊनमुळे गत अडीच महिन्यांपासून उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे परिस्थितीवर मात करण्यासाठी एसटी महामंडळाने मालवाहतूतक सुरु केली आहे. त्यासाठी राज्यात प्रत्येक विभागात 10 प्रमाणे या प्रमाणे 330 बसेसचे मालवाहतूक बसमध्ये रुपांतर करण्यास मान्यता देण्यात आली असून आतापर्यंत 72 बसेस मालवाहतुकीसाठी तयार झाल्या आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील अगोदरच्या 300 आणि नवीन 72 अशा एकूण 372 बसेस सध्या मालवाहतुकीसाठी कार्यरत आहेत. 

आतापर्यंत मालवाहू बसच्या 543 फेऱ्या धावल्या असून 21 लाख रुपयांचे उत्पन्न एसटीने कमावले आहे. विश्वासार्हता आणि सुरक्षितता या दोन प्रमुख गोष्टींमुळे राज्यभरातून एस.टीने मालवाहतूक करणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यामुळे एसटी महामंडळालाही वाढीव उत्पन्नाच्या रुपाने नवसंजीवनी मिळत आहे. 21 मेपासून आतापर्यंत एस.टीने 3 हजार टन मालाची वाहतूक राज्याच्या कानाकोपऱ्यात केली आहे. त्यासाठी 90 हजार कि.मीचा प्रवास या वाहनांनी केला आहे.

जुन्या बसमध्ये बदल
एसटी महामंडळ आपल्या बसेसमधून व्यावसायिक स्वरूपात माल वाहतूक करू शकते, त्यासाठी आवश्यकतेनुसार जुन्या एसटी  बसेसमध्ये बदल करून त्यांचे रूपांतर मालवाहू वाहनांत  करण्यात येत आहे. ज्या प्रवासी वाहनांचे विहित आयुर्मान 6.5 लाख किमी आणि 10 वर्षे पूर्ण झाले आहे, अशा प्रवासी वाहनांच्या अंतर्गत रचनेत बदल करून ही वाहने मालवाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

मालवाहतुकीला पाठबळ
एसटी महामंडळाचे राज्यात 250 आगार आहेत. जवळ जवळ प्रत्येक तालुकास्तरावर हे आगार कार्यरत आहेत. याबरोबर 31 विभागीय कार्यालये, 33 विभागीय कार्यशाळा असा महामंडळाचा मोठा विस्तार भविष्यात एसटीच्या मालवाहतुकीला पाठबळ देणारा आहे.

मालवाहतुकीसाठी स्वतंत्र कक्ष
सध्या प्रत्येक जिल्हास्तरावर एसटीने मालवाहतुकीचे स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून त्यामार्फत एमआयडीसी, कारखानदार, लघुउद्योजक, कृषिजन्य वस्तूंचे व्यापारी यांच्या भेटी-गाठी घेऊन त्यांना एसटीच्या मालवाहतुकीबाबत माहिती दिली जात आहे. यामध्ये शासनाचे अनेक महामंडळे, व्यापारी आपला माल एसटीच्या मालवाहतूक सेवेतून पाठविण्यास उत्सूक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com