esakal | स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत आयुषमान खुराणा ?
sakal

बोलून बातमी शोधा

ayushman khurana

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत आयुषमान खुराणा ?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) आपल्या वेगळ्या अभिनयामुळे प्रख्य़ात झालेले कलाकार म्हणून आयुषमान खुराणा (ayushman khurana) आणि राजकुमार राव (rajkumar rao) यांचे नाव घेता येईल. त्यांनी आपल्या अभिनयातून मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. काही दिवसांपूर्वी मराठीतले आघाडीचे दिग्दर्शक महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (swatanryaveer savarkar) यांच्या आयुष्य़ावर आधारित बायोपिकची निर्मिती करणार आहे. त्यांनी त्या भूमिकेसाठी आयुषमान खुराणाची निवड केली आहे. अशी चर्चा आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर आयुषमानच्या नावाची चर्चा आहे. (ayushmann khurrana to play swatantraveer savarkar in a biopic helmed by mahesh manjrekar)

चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग (sandeep singh)यांनी राजकुमार राव आणि आयुषमान खुराणा यांच्यावर एक वेगळी जबाबदारी दिली आहे. या दोन्ही अभिनेत्यांचे नाव स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चित्रपटासाठी चर्चेत आहे. त्यावरुन त्यांच्या फॅन्सनं त्यांना त्याबाबत प्रश्न विचारले आहेत. मात्र या दोन्ही अभिनेत्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्या दोघांनीही अद्याप आपल्या नव्या भूमिकेबाबत काही सांगितलेले नाही.

राजकुमार रावच्या बाबत सांगायचे झाल्यास, त्याचे करिअर सध्या वेगानं पुढे जाताना दिसते आहे. 2019 मध्ये त्याचे तीन चित्रपट फ्लॉप झाले होता. मात्र गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्याच्या लुडो आणि छलांग चित्रपटानं प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. यावर्षीची सुरुवातीही त्याची प्रभावी झाली आहे. द व्हाईट टायगर मध्ये तो दिसला होता. त्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगला प्रतिसाद मिळाला होता. तर रुही मध्ये त्यानं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतलं होतं.

हेही वाचा: पंतप्रधान मोदींच्या निर्णयांवर 'वेबसीरिज';विपुल शहांचा पुढाकार

हेही वाचा: सोशल मीडियावर 'चेल्लम सरांची' क्रेझ, उदय महेश आहेत तरी कोण?

दुसरीकडे आयुषमान खुराणाचा गुलाबो सिताबो हा ओटीटीवर काही चालला नाही. अमिताभ यांच्या अभिनयाचे तेवढे कौतूक झाले. मात्र आयुषमान त्यात भावला नाही. अंधाधून आणि बधाई हो मध्ये त्याच्या परफॉर्मन्सनं प्रेक्षकांना निखळ आनंद दिला होता. गेल्या चार ते पाच वर्षांपासून आयुषमान खुराणा अत्यंत सावधपणे आपल्या भूमिका निवडताना दिसतो आहे. त्यामुळे तो येत्या काळात स्वातंत्र्यवीर सावकरांची भूमिका करणार की नाही याबाबत आताच सांगणे अवघड आहे.