आयुष्मान खुरानाने केला होता करण जोहरच्या बाबतीत खुलासा, 'तो केवळ स्टार किड्ससोबत काम करतो'

ayushmann khurrana
ayushmann khurrana

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपुतची आत्महत्या आता चर्चेचा विषय बनली आहे. त्याच्या आत्महत्येचं ठोस कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी नैराश्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या सगळ्या प्रकरणात घराणेशाहीचा वाद समोर आल्याने आता काही कलाकार त्यांचे अनुभव मुलाखतीतून सांगत आहेत तर काहींचे घराणेशाहीबद्दलचे जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. नुकताच सोशल मिडियावर एक स्क्रीनशॉट शेअर होत आहे ज्यात आयुष्मान खुरानाने सांगितलं होतं की करण जोहर कसा लोकांना फोन नंबर देऊन त्यांचे फोन टाळतो ते. 

आयुष्मान खुराना सिनेमांमध्ये येण्याआधी आर.जे होता. त्यादरम्यान आयुष्मानने करणची मुलाखत घेतली होती आणि त्याला सांगितलं होतं की त्याला अभिनेता बनण्याची इच्छा आहे. या व्हायरल मुलाखतीत त्याने लिहिलंय की, 'मुलाखतीच्या शेवटी करणने त्याचा लँडलाईन नंबर मला दिला. मी खूपंच उत्सुक होतो. आणि असा विचार करत होतो की आता आपलं करिअर एकदम सेट आहे. आता मला कोणीही थांबवू शकत नाही. आता तर धर्मा प्रोडक्शन इंट्रोड्युसिंग आयुष्मान खुराना असं असेल.

मी नंबर लावला तेव्हा मला सांगण्यात आलं की करण ऑफीसमध्ये नाहीये, दुस-या दिवशी मी पुन्हा फोन केला तेव्हा मला तो व्यस्त असल्याचं सांगण्यात आलं. आणि शेवटी माझा विश्वास उडाला जेव्हा त्यांनी मला अतिशय स्पष्टपणे सांगितलं की आम्ही केवळ स्टार्ससोबत काम करतो आणि तुमच्यासोबत काम करु शकत नाही.'

करण जोहरवर आधीपासूनंच नेपोटिझमचा आरोप करण्यात येत होता. कंगना अनेकवेळा याबाबतीच तिचं परखड मत मांडताना दिसून आलीये. सुशांतच्या आत्महत्येनंतर सिनेइंडस्ट्रीतील एका खास ग्रुपवर सुशांतला बॉयकॉट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस याबाबतीत अधिक तपास करत असून अजुन त्याच्या आत्महत्येचं खरं कारण समजू शकलेलं नाही.    

ayushmann khurrana told in old interview that karan johar works only with stars  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com