
अनुष्काच्या बाळंतपणाची गोड बातमी ऐकण्यासाठी सगळेजण उत्सुक होते. विराट आणि अनुष्काला मुलगा होणार की मुलगी याबाबत एका ज्योतिषानं भविष्य वर्तवलं होतं.
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना कन्यारत्न झाले. ही बातमी वा-यासारखी सगळीकडे पसरली. सोशल मीडियावर त्या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला आहे. अनेक सेलिब्रेटींनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनुष्काच्या गरोदरपणातील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. योगासने करण्याच्या पोस्टही तिनं शेयर केल्या होत्या.
अनुष्काच्या बाळंतपणाची गोड बातमी ऐकण्यासाठी सगळेजण उत्सुक होते. विराट आणि अनुष्काला मुलगा होणार की मुलगी याबाबत एका ज्योतिषानं भविष्य वर्तवलं होतं. पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी सांगितल्यानुसार, विरुष्काला एक गोंडस मुलगी होईल असे त्यांनी सांगितले होते. तिच्या पावलांमुळे त्यांच्या जीवनातील आनंद द्विगुणित होणार असून दोघांचा चेहरा पाहिल्यावर त्यांना मुलगी होणार असल्याचं दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. ही मुलगी वडिलांसाठी एका राजकन्येप्रमाणे असेल,तर आईची लाडकी असेल.
अनुष्का तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. शेवटच्या महिन्यांतही तिनं योगासनं करतानाच्या पोस्ट शेयर केल्या होत्या. यावेळी तिनं तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिले होते. आता तीन ते चार दिवसांपूर्वी ती ट्रेडमीलवर चालताना व शीर्षासन करतानाचा फोटो, व्हिडीओ व्हायरल झाला होता. विरुष्काने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली होती.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आई-बाबा झाले आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या दोघांनी ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तेव्हापासून विरुष्का सोशल मीडियावर चर्चेत आहे.विरुष्काला मुलगा होणार की मुलगी अशी चर्चादेखील चाहत्यांमध्ये काही दिवसांपूर्वी रंगली होती.
विराट-अनुष्काच्या घरी छोट्या परीचं आगमन
‘इंडिया. कॉम’च्या वृत्तात याविषयी नमूद करण्यात आलं होत. नव्या वर्षात विरुष्का दोनाचे तीन झाले आहेत. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष त्यांच्या गुडन्यूजकडे लागलं होतं. प्रसिद्ध ज्योतिष पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी विरुष्काला मुलगा होणार की मुलगी हे सांगितलं होतं.