नेटफ्लिक्सची 'बॅड बॉय बिलिनेयर' कायद्याच्या कचाट्यात ?

युगंधर ताजणे
Wednesday, 14 October 2020

यापुढील काळात 'बॅड बॉय बिलिनेयर' ठराविक कालावधीनंतर प्रेक्षकांसमोर येणार आहे. यात ज्या व्यक्तिरेखांवर आधारित वेबसीरिज तयार करण्यात आली आहे त्यातील काहींनी आपला अपप्रचार होत असल्याची टीका केली आहे. याकारणामुळे दाद मागण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे.

मुंबई-देशातील महत्वपूर्ण घोटाळ्यांवर आधारित असणारी बहूचर्चित वेबसीरीज 'बॅड बॉय बिलिनेयर' ही आता कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. मात्र यावर नेटफ्लिक्सने टप्प्याने प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठे आर्थिक घोटाळे करुन देशाबाहेर गेलेल्या व्यक्तिंवर या वेबसीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपूर्वी देशात खळबळ उडवून देणा-या घटनांनी संपूर्ण देश हादरुन गेला होता.

यापुढील काळात 'बॅड बॉय बिलिनेयर' ठराविक कालावधीनंतर प्रेक्षकांसमोर येणार आहे. यात ज्या व्यक्तिरेखांवर आधारित वेबसीरिज तयार करण्यात आली आहे त्यातील काहींनी आपला अपप्रचार होत असल्याची टीका केली आहे. याकारणामुळे दाद मागण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे. आतापर्यत एक वादग्रस्त माहितीपट म्हणून याकडे पाहिले जात होते.भारतातील 4 प्रसिध्द उद्योगपतींवर ही माहितीपटाची मालिका आधारित आहे. त्यात विजय मल्ल्या, नीरव मोदी, सुब्रुतो रॉय आणि बी रामलिंग राजू यांचा समावेश आहे. यातील काहींनी या माहितीपटातून आपली बदनामी होत असल्याचा आरोप करुन न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

धोनीच्या मुलीला धमकावणा-यास कडक शिक्षा मिळावी; आर माधवन याने केले टविट्

डेलन मोहन ग्रे यांनी दिग्दर्शन केलेल्या या माहितीपटाचे चारपैकी 3 भाग हे प्रदर्शनासाठी तयार आहेत. तसेच मेहूल चोक्सी यांनी माहितीपटाच्या विरोधात घेतली आहे. प्रसिध्द होणा-या भागांची नावे पुढीलप्रमाणे आहे. "The King of Good Times" ही मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्यावर आधारित आहे.  "Diamonds Aren't Forever" ही प्रसिध्द हिरेव्यापारी नीरव मोदी आणि "The World's Biggest Family" ही सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्यावर आधारित मालिकेचे नाव आहे.

वृत्तवाहिन्यांविरोधात बॉलीवूडचा प्रतिसाद थंडच; दिग्दर्शक राम गोपाल वर्मांची टीका

अरारिया जिल्यातील एका कोर्टाने या मालिकेत रॉय यांचे नाव वापरता येणार नसल्याचे स्पष्ट केले. रॉय यांनी या मालिकेमुळे आपली प्रतिमा मलिन होत असल्याचे म्हटले आहे.रामलिंग राजू यांच्या जीवनावर आधारित माहितीपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. त्यावर हैद्राबाद न्यायालयाचा स्टे असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावरील सुनावणी अद्याप न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, मोदी आणि मल्ल्या सध्या युके मध्ये असून त्यांना भारतात परत आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bad Boy Billionaires amid legal battles