वृत्तवाहिन्यांविरोधात बॉलीवूडचा प्रतिसाद थंडच; दिग्दर्शक राम गोपाल वर्मांची टीका

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 13 October 2020

बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टात धाव घेतली आहे.  रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात काही बॉलिवूड कलाकारांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली आहे.

मुंबई -सुशांतसिंग प्रकरणाला जे वेगळे वळण मिळाले त्यातून बॉलीवूडमधल्या अनेक खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहेत. विशेषत; बॉलीवूडमधले ड्रग्ज प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात बॉलीवूडची नाचक्की देखील झाली आहे. ते करण्यात काही वृत्तवाहिन्या कारणीभूत ठरल्यावरुन दिग्गज सेलिब्रेटींनी एकत्र येऊन त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे.

बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टात धाव घेतली आहे.  रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात काही बॉलिवूड कलाकारांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली आहे.  मात्र बॉलीवूडच्य़ा अशाप्रकारच्या प्रतिक्रियेला प्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माता रामगोपाल वर्मा यांनी टीका केली आहे.

धोनीच्या मुलीला धमकावणा-यास कडक शिक्षा मिळावी; आर माधवन याने केले टविट्

‘बॉलिवूडकडून आलेली प्रतिक्रिया खूप उशिरा आणि खूप थंड अशा प्रकारची म्हणता येईल. चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेणं म्हणजे एका शाळेतल्या मुलाने शिक्षकाकडे जाऊन, ‘टिचर, टिचर, तो अर्णब मला शिवी देतोय’ असं तक्रार करण्यासारखं आहे,’ असं ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केलं.

चित्रपट उद्योगाविरुद्ध ‘बेजबाबदार, मानहानीकारक आणि अपमानास्पद’ प्रसारण करण्यापासून, तसेच या उद्योगातील व्यक्तींविरुद्ध ‘मीडिया ट्रायल्स’ घेण्यास रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊ या वृत्तवाहिन्यांना प्रतिबंध करावा, अशी मागणी करणारी याचिका बॉलिवूडमधील आघाडीच्या निर्मात्यांनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली. मात्र ही याचिका दाखल करणे म्हणजे बालिश असल्याची प्रतिक्रिया दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी दिली. या प्रकरणाची तुलना त्यांनी थेट शालेय जीवनाशी केली.

भोजपूरी गाण्यांमधील अश्लिललेचा मुद्दा खासदार रविकिशन संसदेत मांडणार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram Gopal Varma Says Bollywood Lawsuit Against News Channels Too Late too thanda