Badla : अमिताभ आणि तापसीत थ्रिलरचा जबरदस्त खेळ
अमिताभ बच्चन व अभिनेत्री तापसी पन्नू यांची मुख्य भूमिका असलेला 'बदला' थ्रिलर चित्रपट आहे.
मुंबई : 'बदला' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी चित्रपटानिमित्ताने एकत्र काम केले आहे. पण महानायकच चित्रपटाच भूमिका करताना दिसतील तर चित्रपट निर्मात्याची धुरा शाहरुख खानने सांभाळली आहे.
अमिताभ बच्चन व अभिनेत्री तापसी पन्नू यांची मुख्य भूमिका असलेला 'बदला' थ्रिलर चित्रपट आहे. 8 मार्चला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलर वरुन तरी कथा अशी कळते की, एक मुलगी तिच्या बॉयफ्रेंड सोबत तीन महिन्यापासून राहते आहे. कुणालातरी हे जोडपं सोबत राहत असल्याचे कळते. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेलींग सुरु होते. एक दिवस घरातच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला होतो. ज्यात मुलीला जखमी व बेशुध्द करुन मुलाचा खून केला जातो. मुलगी शुध्दीवर आल्यानंतर मुलाकडे धाव घेते, तर त्याचा मृत्यू झाला असतो. पण तोपर्यंत पोलिस तेथे पोहोचते आणि खून केल्याच्या संशयावरुन मुलीला अटक करते.
'बदला'चा शूटींग ग्लासगो येथे झाली आहे. सुजोय घोष यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
'बदला' ट्रेलर :