Badshah Video: बापरे! बादशाह स्टेजवरुन धाडकन पडला? व्हिडिओ शेयर करत म्हणाला,...

प्रसिद्ध रॅपर बादशहा हा नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतो. सध्या त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Badshah Video
Badshah VideoEsakal

Badshah Video: प्रसिद्ध रॅपर बादशहा हा नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतो. कधी त्यांची गाणी खुप हिट होतात तर कधी त्या गाण्यामुळे तो वादात सापडतो. नुकताच बादशाहनं एका मुलाखतीत त्याच्यातील आणि हनी सिंग यांच्यातील वादाची कारणं सांगतिली.

मात्र सध्या सोशल मिडियावर बादशाहची खुप चर्चा सुरु आहे. त्याचे कारण आहे एक व्हिडिओ . सोशल मिडियावर दावा करण्यात येत आहे की तो व्हिडिओ रॅपर बादशाहचा आहे. या व्हिडिओ बादशाह स्टेजवर परफॉर्म करताना दिसतो आणि अचानक धाडकन स्टेजवरुन खाली पडतो. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. त्यामुळे काहींनी बादशाहला ट्रोल केलं. बादशाहच्या चाहत्यांना त्याची काळजी होत होती.

Badshah Video
Bigg Boss OTT 2: बिग बॉसचं घर कमी अन् 'वधू-वर सूचक केंद्र' जास्त! आणखी एका लव्ह बर्ड्सची चर्चा

आता या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी बादशाहनं स्पष्टीकरण दिलं आहे. नेमकं काय घडलं आहे. हे सांगतांना बादशाहनं एक व्हिडिओ देखील चाहत्यांसोबत शेयर केला आहे.

जेव्हा या व्हिडिओची चर्चा रॅपर बादशाह यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांने स्पष्टपणे या व्हिडिओला नकार दिला. त्याने स्टेजवर परफॉर्म करणारी आणि तिथून पडणारी व्यक्ती कुणी दुसरी असल्याचं सांगितलं आहे.

Badshah Video
Taapsee Pannu: 'प्रेग्नेंट नाही म्हणुन लग्न....', तापसी जेव्हाही बोलते तेव्हा चर्चाच होतेच

त्याने व्हिडिओ शेयर करत याची माहिती दिली आहे. तो या व्हिडिओ म्हणतो की, मित्रांनो, मी पूर्णपणे बरा आहे, मी कोणत्याही स्टेजवरून पडलो नाही. माझे हात पाय सर्व ठीक आहेत. स्टेजवरून पडलेली ती व्यक्ती बरी असावी अशी अपेक्षा करतो. त्यानंतर हा व्हिडिओ शेयर करत बादशाहने ट्विटही केले आहे.

Badshah Video
Baipan Bhari Deva: "एव्हढा काय चांगला पिच्चर नाही..", चित्रपट समीक्षकाची 'बाईपण भारी देवा' सिनेमासाठीची पोस्ट चर्चेत

व्हायरल व्हिडिओ आहे तरी काय?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक व्यक्ती स्टेजवर परफॉर्म करत आहे आणि त्याच्या गाण्यावर प्रेक्षक नाचतांनाही दिसत आहे. या व्यक्तीनं काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि शॉर्ट्स असलेल्या पांढरा स्नीकर्स घातला आहे. गाताना त्या व्यक्तींचा अचानक तोल जातो आणि तो खाली पडतो. मात्र ती व्यक्ती हुबेहूब बादशाहसारखी दिसत आहे. त्यामुळे चाहते संभ्रमात पडले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com