मी झाले कृष्णमयी 

तेजल गावडे  
सोमवार, 29 मे 2017

सध्या "बाहुबली- द कन्क्‍लूजन' या चित्रपटातील प्रत्येक गोष्टीचं कौतुक होतंय. त्यातल्या अगदी छोट्यात छोट्या घटनाही चर्चेत आहेत. यातली गाणी तर अनेकांच्या ओठांवर आहेत. ही गाणी चार भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत. त्यातल्या हिंदी भाषेतील गाण्यांचाही खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यात खास करून "कान्हा सोजा जरा' या गाण्याला अधिक पसंती मिळालीय. मग काय म्हणतेय या गाण्याला स्वरसाज देणारी मधुश्री? "बा हुबली- द कन्क्‍लूजन'नं जगभरात 1500 कोटींचा टप्पा पार केलाय. या सिनेमानं आणि त्यातील गाण्यांनी सर्वांना अक्षरश: वेड लावलंय.

सध्या "बाहुबली- द कन्क्‍लूजन' या चित्रपटातील प्रत्येक गोष्टीचं कौतुक होतंय. त्यातल्या अगदी छोट्यात छोट्या घटनाही चर्चेत आहेत. यातली गाणी तर अनेकांच्या ओठांवर आहेत. ही गाणी चार भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत. त्यातल्या हिंदी भाषेतील गाण्यांचाही खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यात खास करून "कान्हा सोजा जरा' या गाण्याला अधिक पसंती मिळालीय. मग काय म्हणतेय या गाण्याला स्वरसाज देणारी मधुश्री? "बा हुबली- द कन्क्‍लूजन'नं जगभरात 1500 कोटींचा टप्पा पार केलाय. या सिनेमानं आणि त्यातील गाण्यांनी सर्वांना अक्षरश: वेड लावलंय.

त्यातील श्रीकृष्णाला उद्देशून असलेलं "कान्हा सोजा जरा...' हे गाणं सध्या खूपच लोकप्रिय झालंय. या गाण्याला स्वरसाज लाभलाय तो गायिका मधुश्रीचा. बॉलीवूडमधील "कल हो ना हो', "स्वदेस', "पहेली', "युवा', "रंग दे बसंती', "शिवाजी : द बॉस', "रोबोट' आणि "रांझना' या चित्रपटातील गाणी तिने गायलीत; मात्र भारतातील सर्वात भव्यदिव्य अशा "बाहुबली - द कन्क्‍लूजन'' (हिंदी भाषा) मधील "कान्हा सोजा जरा...' हे गाणं गायलं मिळणं हे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही, असं मधुश्री सांगते. "रांझना' चित्रपटानंतर मी बऱ्याच छोट्या-मोठ्या सिनेमांसाठी गाणी गायलीत. पण "बाहुबली 2' चित्रपटातील गाणं गायला मिळालं हे माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं. 

मला हैदराबादहून एक फोन आला आणि त्यांनी "बाहुबली 2' चित्रपटातील गाणं गाण्यासाठी मला हैदराबादला बोलावलं. मला सुरुवातीला वाटलं की तेलगु गाणं गायचंय आणि त्या वेळी मी "झी बांग्ला वाहिनी'वरील "सारेगमप' या शोचं परीक्षण करत होते. त्यांच्यासोबत मी कॉन्ट्रॅक्‍ट साईन केलं होतं. त्यामुळे सुरुवातीला नाही सांगितलं; पण बाहुबली 2 चित्रपटासाठी गाणं गायचंय आणि संगीतकार किरवानी यांनी तुमचं नाव सुचवलंय तर तुम्हाला यावंच लागेल, असं फोनवर सांगितलं गेलं. त्यामुळे मला आश्‍चर्य वाटलं की, "बाहुबली 2' तर प्रदर्शनासाठी सज्ज झाला असणार. पण ते म्हणाले की, त्यातील एक गाणं तुमचीच वाट पाहतंय. तेव्हा माझ्या पतींनी फोन उचलला आणि "बाहुबली 2' चित्रपटासाठी गाणं गायचंय तर ती येईल, असं सांगितलं. मी हैदराबादला गेले. तिथे मी किरवानी यांना भेटले. किरवानी यांच्यासोबत मी आठ-नऊ वर्षांपूर्वी "पहेली' चित्रपटातील दोन गाणी गायली होती. त्यानंतर आम्ही एकमेकांच्या संपर्कात नव्हतो; पण आठ-नऊ वर्षांनंतर किरवानी यांनी माझा नंबर शोधून काढला आणि या गाण्यासाठी माझी निवड केली. "हे गाणं खूप आव्हानात्मक आहे आणि ते तूच गाऊ शकतेस. "कान्हा सोजा जरा' हे गाणं कृष्ण-भजन असून यात शास्त्रीय बाज आणि रोमॅंटिक भावनाही आहेत. हे एक अंगाईगीत आहे. एकाच गाण्यात या सर्व गोष्टी फक्त मधुश्रीचं आणू शकते' असं किरवानी म्हणाले. हे ऐकून मला खूप भारी वाटलं. हे गाणं मी ऐकलं. हे गाणं इतकं छान आहे की, अशा प्रकारचं गाणं यापूर्वी मी कधीच गायलं नव्हतं. अभिनेत्री अनुष्का शेट्टी म्हणजेच देवसेना कृष्णाला उद्देशून एक अंगाई गीत गातेय आणि तिच्या प्रेमात असलेला अमरेंद्र बाहुबली तिचं हे गाणं ऐकतोय. अशा प्रकारे हे गाणं खूप छान चित्रीत करण्यात आलंय, असं मधुश्री सांगत होती. ती पुढे म्हणाली, भारतीय चित्रपटसृष्टीत "बाहुबली 2'नं अनेक विक्रम केलेत. याचा मीही एक भाग असल्यामुळे स्वत:ला खूप नशीबवान समजते. 

आतापर्यंत बॉलीवूडमध्ये चित्रपटातील गाणी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बऱ्याच वेळा दाखवली जातात. त्यानंतर ही गाणी हिट होतात. मग प्रेक्षक चित्रपट पाहायला जातात; पण "बाहुबली' चित्रपटाच्या बाबतीत याउलट घडलं. "बाहुबली 2' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यातील गाणी कुठेही अजिबात दाखवली गेली नाहीत. तरीदेखील गाणी सुपरहिट ठरली. "बाहुबली 2' मधील या गाण्यानंतर पुन्हा एकदा माझ्या करियरला कलाटणी मिळालीय. "कान्हा...' या गाण्यासाठी जगभरातून मला खूप चांगल्या प्रतिक्रिया येताहेत. तसंच खूप प्रेम मिळतंय. लवकरच मी हॉलंडला जाणार आहे. तिथल्या सरकारने मला एका कार्यक्रमात हे गाणं गाण्यासाठी बोलवलं आहे. त्यामुळे मी खूप खूश आहे. "कबाडी', "लव्ह यू फॅमिली' व "आम्रपाली' हे मधुश्रीचे आगामी प्रोजेक्‍ट असून "बाहुबली 2' नंतर तिला बऱ्याच ऑफर येत असल्याचं तिने सांगितलं. मधुश्रीला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा! 

'ई सकाळ'वरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सापाने दंश केल्याने बालकाचा मृत्‍यू 

गड्यांनो, आपले गाव विकासापासून कोसो मैल दूर

योयो परत येणार रे..!!

इंग्रजी शाळांत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश

इंदापुरात राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प

... आता पुढचं आयुष्य फक्त देशासाठीच!

दहशतवादी पाकबरोबर क्रिकेट नाहीच: क्रीडामंत्री

मॉन्सून आणि मार्केट

आजच्या काळात तुमची खरी कसोटी : विद्यासागर राव

सैनिक तीन महिलांवर बलात्कार करू शकतात

 

Web Title: bahubali 2 fame songs madhushree interview