'बायकोला हवयं तरी काय', भन्नाट, हटके, आणि विनोदी वेबसीरीज

शरयू काकडे
Friday, 4 December 2020

सामान्य गृहिणी श्रेया च्या भूमिकेत अभिनेत्री श्रेया बुगडे, श्रीकृष्णाच्या भूमिकेत निखिल रत्नपारखी, अविनाशच्या भुमिकेत अनिकेत विश्वासराव यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनात सोडली आहे. प्रियदर्शन जाधव यांनी या ६ एपिसोडमधील वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे.   परफ्केट कॉमिक टायमिंग, परफेक्ट पंचलाईन, आणि फुल्ल ऑन कॉमेडी कथेवर आधारीत ही वेबसिरिज प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणार आहे.

प्रत्येक बायकोला आपला नवरा एखाद्या सुपरस्टार सारखा देखणा, पोलिसांसारखा धाडसी, राजकारण्यांसारखा रुबाबदार,  बिझेनेसमन सारखा हुशार असा हवा असतो. आपल्या नवऱ्यामध्ये हे गुण शोधणारी सर्व सामान्य बायको श्रेया. आपल्या  साधा सरळ आणि गुणी नवऱ्याला बावळट, आळशी अक्कलशुन्य समजणारी श्रेया श्रीकृष्णाला  भक्तीमधून प्रसन्न करते. आपल्या नवऱ्याला अपग्रेड करण्याची प्रार्थना  श्रीकृष्णाला करते. श्रीकृष्ण देखील तिच्या इच्छेला तथास्थु म्हणतो आणि नवऱ्याला अपग्रेड करतो तिला हवा तशा रुपात अविनाशला अपग्रेड करतो. अशी विनोदी, हटके आणि भन्नाट वेबसिरीज 'बायोकला हवंय तरी काय' एमएक्स प्लेअर एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची प्ले ओरीजनल घेऊन आली आहे.

एमएक्स प्लेअरने अनेक वेगवेगळ्या विषयांवर आधारीत, समांतर, आणि काय हवं, पांडू, इडियट बॉक्स अशा भन्नाट, हटके वेबसिरीज प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. बायकोला हवं तरी काय या नवीन वेबसिरीजद्वारे मनोरंजनाची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे.

कलावंत झाले 'राजकीय'; चित्रपट क्षेत्रातील कलाकार जेव्हा होतात 'नेते'

सामान्य गृहिणी श्रेयाच्या भूमिकेत अभिनेत्री श्रेया बुगडे, श्रीकृष्णाच्या भूमिकेत निखिल रत्नपारखी, अविनाशच्या भुमिकेत अनिकेत विश्वासराव यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनात सोडली आहे. प्रियदर्शन जाधव यांनी या ६ एपिसोडमधील वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे. परफ्केट कॉमिक टायमिंग, परफेक्ट पंचलाईन, आणि फुल्ल ऑन कॉमेडी कथेवर आधारीत ही वेबसिरिज प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणार आहे.

प्रियदर्शन जाधव या वेबसिरीज बद्दल सांगतो "प्रत्येकाला आपले आयुष्य अपग्रेड व्हावं असं नेहमीच वाटत. आपली गाडी, आपल घर अपग्रेड व्हावं असे वाटत असते. पण जर आपल्याला आपल्या जोडीदाराला 'अपग्रेड" करतो? तेव्हा काय होते हेच या कथेतून विनोदी, मनोरंजनाचा कल्लोळ श्रेया, अनिकेत आणि निखिलच्या परफेक्ट टायमिंगसह आपल्या भेटीला येत आहे आणि मला अशी आशा आहे की प्रेक्षकांना सिरीज पाहताना ही तितकाच आनंद मिळेल.

हे ही वाचा: कंगनाने सोशल मिडियावर हिमांशी खुरानाला केलं ब्लॉक  

श्रेया बुगडे पुढे म्हणाली, “माझे पात्र एका साध्या गृहिणीचे आहे जिला आपल्या नवऱ्यासाठी आणि स्वतःसाठी सर्व काही चांगल तेच हवं असते. तिच्या प्रत्येक इच्छेला जेव्हा भगवान श्रीकृष्ण तथास्तु म्हणतात, तेव्हा नवनवीन गोष्टी पाहायला मिळतील. मला खात्री आहे की सर्व गोष्टींच्या शेवटी स्वतः भगवान श्री कृष्णाला ही प्रश्न पडेल नक्की या 'बायकोला हवं तरी काय'.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baykola havay tari kay Web Series of Shreya Bugade, Aniket Vishwasrao and Nikhil Ratnaparkhi