शाकाहारी असूनही राजकुमारने बनवली दमदार बॉडी; सिक्स-पॅक अ‍ॅब्स पाहून नेटकरी फिदा

rajkummar rao
rajkummar rao

राजकुमार रावचा 'रुही' हा हॉरर कॉमेडी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची धमाल सुरू असतानाच आता राजकुमार त्याच्या आगामी चित्रपटाच्या जोरदार तयारीला लागला आहे. 'बधाई दो' असं त्या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटातील लूकचा फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमधील त्याची शरीरयष्टी आणि सिक्स पॅक अॅब्स पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. हर्शवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपटासाठी राजकुमारने फार मेहनत घेतली असून यामध्ये तो एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे तशा शरीरयष्टीसाठी गेल्या काही महिन्यांपासून तो काम करत आहे. विशेष म्हणजे शुद्ध शाकाहारी असून कोणत्याही स्टेरॉइड्सचा आधार न घेता राजकुमारने अशी बॉडी बनवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही त्याचं कौतुक होत आहे. 

जिममधला फोटो पोस्ट करत राजकुमारने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'बधाई दोमध्ये शार्दुल ठाकूरची भूमिका साकारतोय. शुद्ध शाकाहारी असताना आणि कोणत्याही प्रकारचे स्टेरॉइड्स न वापरता असं ट्रान्सफॉर्मेशन होणं सहज सोपं नव्हतं. पण जेव्हा तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करता तेव्हा कोणतीच गोष्ट अशक्य वाटत नाही. बधाई दो हा चित्रपट माझ्या हृदयाजवळचा आहे आणि शूटिंगदरम्यान आम्ही खूप धमाल केली.'

राजकुमारने पहिल्यांदाच एखाद्या भूमिकेसाठी अशा पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन केलेलं नाही. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित ट्रॅप्ड या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने सात किलो वजन कमी केलं होतं. अवघ्या २२ दिवसांच्या आत त्याने हे वजन कमी केलं होतं. त्यानंतर वेब सीरिजच्या पदार्पणातच राजकुमारने ११ किलो वजन वाढवलं होतं. हंसल मेहता दिग्दर्शित 'बोस : डेड/अलाइव्ह' या सीरिजमध्ये त्याने सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याला वजन वाढवावं लागलं होतं. २०१७ मध्ये ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. 

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बधाई हो' या चित्रपटाचा सीक्वेल 'बधाई दो' असणार आहे. 'बधाई हो'मध्ये आयुषमान खुराना, नीना गुप्ता आणि गजराज राव यांच्या मुख्य भूमिका होत्या. आता 'बधाई दो' यामध्ये राजकुमारसोबत भूमी मुख्य भूमिका साकारणार आहे. राजकुमार पोलिसाच्या तर भूमी एका पीटी शिक्षिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com