esakal | 'मोदीजी, तुम्हाला लाज नाही वाटत?'; अभिनेत्रीचा संतप्त सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

 narendra modi

'मोदीजी, तुम्हाला लाज नाही वाटत?'; अभिनेत्रीचा संतप्त सवाल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बंगाल विधानसभा निवडणुकींनंतर बंगालमधील वातावरण खराब झाले आहे. यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलिवूडची कोन्ट्रवर्सि क्विन कंगना रणौतने देखील बंगालमधील परिस्थितीवर ट्विटरवर भाष्य केले. तिला ते चांगलेच माहगात पडले कंगनाला ट्विटरने नुकतेच बॅन केले आहे.

बंगालमधील वातावरणाबद्दल आता अभिनेत्री पायल रोहतगीचा (payal rohatgi) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये बोलताना पायलला तिचे अश्रु अनावर झाले. त्याचे कारण बंगालमधील झालेला हिंसाचार (bengal violence) आहे, असे तिने व्हिडीओमध्ये सांगितले. या व्हिडीओमध्ये पायलने व्यवस्थेवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्यावर आरोप केले आहेत.

व्हिडीओमध्ये पायल म्हणाली, 'मोदीजी तुम्हाला लाज वाटत नाही. जे लोक तुम्हाला सपोर्ट करतात, त्यांच्यासोबत तुम्ही असे का वागता. तुम्ही लोकांची फसवणूक करत आहेत . मोदीजी हे ठिक नाही. आम्ही तुम्हाला सपोर्ट नाही करायचा की नाही? आम्हालाच का टार्गेट केलं जात?.तुम्हाला असंख्य लोकांनी मते दिली आहेत. लोकशाही मार्गाने तुम्ही सत्तेत आला. असे असताना देखील तुम्हाला सपोर्ट करणाऱ्यांना टार्गेट केले जात आहे. मोदीजी तुम्हाला जे करायचे आहे ते करा पण लोकांची हत्या होता कामा नये.' या व्हिडीओमध्ये पायलने मोदींवर आरोप केले आहेत.

हेही वाचा: व्वा भाईजान! अनाथाला दिली जगण्याची नवी आस

हेही वाचा: ‘Koo तुमच्या घरासारखे बाकी सगळे.. ’, ट्विटरने बॅन करताच कंगनाचे 'कू'वर जंगी स्वागत

या व्हिडीओमुळे सध्या पायलला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. 'हा व्हिडीओ पाहिल्या नंतर मोदीजी रात्री जेवले नसतील' अशी विनोदी कमेंट एका नेटकऱ्याने केली. तर एकाने पायलच्या व्हिडीओला कमेंट केली 'कंगना दीदीचं अकाऊंट सस्पेंड झालं तर पायल दीदी ढसाढसा रडू लागली.' तर एक युजरने 'ओव्हर अॅक्टिंगचे 50 रुपये कट करा' अशी कमेंट केली आहे. याआधी देखील पायलने सरकारबद्दल आणि यंत्रणेबद्दल आपले मत सोशल मीडियावर मांडले होते. तेव्हा देखील तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते.