व्वा भाईजान! अनाथाला दिली जगण्याची नवी आस

सलमानने (salman khan) कर्नाटक मधील एका १८ वर्षाच्या विद्यार्थ्याला मदत केली आहे.
Salman khan
Salman khanTeam esakal

मुंबई - दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अनेक लहानमुलं कोरोनामुळे अनाथ झाली आहेत. या मुलांची जबाबदारी आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (salman khan) घेणार आहे. सलमानने या मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सलमानची (salman khan) 'बिइंग ह्यूमन फाउंडेशन' (being human) नावाची संस्था आहे. या संस्थेमर्फत तो लोकांना मदत करत असतो. नुकतीस सलमानच्या या संस्थेने मुंबईतील फ्रंटलाईन वर्कर्स, पोलीस, वैद्यकिय कर्मचारी आणि पालिका कर्मचाऱ्यांसाठी दररोज चहा, नाश्त्याची व्यवस्था केली होती. या उपक्रमाची पाहणी सलमानने स्वत: केली होती. सलमानच्या या उपक्रमाचे कौतुक तेव्हा सोशल मीडियावर झाले होते. आता सलमानने आणखी एक सामाजिक कार्य करून लोकांचे मन जिंकली आहे.

सलमानने (salman khan) कर्नाटक मधील एका १८ वर्षाच्या विद्यार्थ्याला मदत केली आहे. त्या मुलाच्या वडिलांचे करोनाने निधन झाले. सलमानने केलेल्या या कार्याबद्दल युवा सेनेचे नेते राहुल एस. कानल यांनी सांगितले, 'सलमानने या मुलाच्या खाण्या पिण्याचा आणि शैक्षणिक वस्तूंची संपूर्ण व्यवस्था केली असल्याचे त्याने सांगितले आहे. जेव्हा पण या विद्यार्थ्याला मदतीची गरज असेल तेव्हा सलमान कधी माघार घेणार नाही.' संकट काळात सलमानच्या या मदतीचे सर्वजण कौतुक करत आहेत.

Salman khan
लग्नाच्या वाढदिवशीच सखी-सुव्रत कोव्हिड पॉझिटिव्ह
Salman khan
ट्विटरनंतर कंगनाला फॅशन डिझायनर्सकडून धक्का; सोबत काम करण्यास दिला नकार

सलमानच्या (salman khan) 'बिंग ह्युमन' ' (being human) या संस्थेमार्फत त्याने करोना काळात अनेकांची मदत केली आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये 'बिइंग ह्यूमन फाउंडेशन' संस्थेकडून जवळपास 2 लाख गरजूंना अन्नधान्य पुरवठा करण्यात आला होता. याशिवाय हजारो मजुरांना सलमानने आर्थिक मदत केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com