बंगाली अभिनेत्री पायल सरकारच्या पतीला अटक; नोकरीच्या आमिषानं केली होती फसवणूक

Sohail Saha
Sohail Sahaesakal
Summary

आरोपीला आज बिधाननगर न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

नोकरीचं आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी बंगाली अभिनेत्री (Bengali Film Actress) पायल सरकारचा पती सोहेल साहाला (Sohail Saha) अटक केलीय. बिधाननगर सायबर क्राईम पोलिसांनी (Bidhannagar Cyber Crime Police) आरोपीला अटक केलीय. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सायन दास नावाच्या तरुणानं बिधाननगर सायबर क्राइम पोलिसात येऊन फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या आरोपाच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आलीय. बुधवारी पोलीस त्याला न्यायालयात हजर करून कोठडीची मागणी करणार आहेत.

तक्रारदार सायन दासचा दावा आहे की, तो सोहेल साहा नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता. त्यानं स्वतःची ओळख बंगाली अभिनेत्री पायल सरकारचा (Bengali Actress Payel Sarkar) पती अशी करून दिली. त्यानंतर त्यानं तक्रारदाराला खासगी कंपनीत नोकरीचं आश्वासनही दिलं होतं. तरुणानं होकार दिल्यावर त्याला मुलाखत देण्यास सांगण्यात आलं. वारंवार मुलाखती देऊनही या तरुणाला नोकरी मिळाली नाहीय.

Sohail Saha
लग्नमंडपात नवरदेवाच्या डोक्यावरील वीग पडल्याने मोडलं लग्न

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीनं सायनला कोट्यातून नोकरी लावण्यासाठी 1 लाख 40 हजार रुपये देण्यास सांगितलं. त्यानुसार तरुणानं पैसे दिले. तेवढ्यात त्याला एक मेल आला. मात्र, तो कंपनीमधून आला नसल्यानं तरुणाला संशय आला. ही बाब सायबर क्राईम पोलिस ठाण्यात नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस तपासानुसार, आरोपी कोणत्याही संस्थेत काम करत नाही. तरुणानं दिलेले पैसे हे आरोपीच्या वडिलांचे बँक खाते आहे. ते पैसे आरोपीच्या वडिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. दरम्यान बिधाननगर सायबर क्राईम स्टेशनच्या पोलिसांनी काल रात्री मुख्य आरोपी अभिनेत्री पायल सरकारचा पती सोहेल साहाला अटक केलीय. आरोपीला आज बिधाननगर न्यायालयात (Bidhannagar Court) हजर केलं जाणार असून पोलीस त्याला ताब्यात घेण्याची विनंती करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com