Jeetu Gupta: 'भाभीजी घर पर है' फेम जीतूच्या मुलाचे निधन

कॉमेडियन सुनील पालनं सोशल मीडियावरुन ही धक्कादायक बातमी व्हायरल केली होती.
Jeetu Gupta Son ayush gupta
Jeetu Gupta Son ayush gupta esakal

Bhabhi ji ghar par hai fame Jeetu Gupta Son Ayush Passed Away: टीव्ही मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाभीजी घर पर है मालिकेतील प्रमुख कलाकार जीतु गुप्ता यांच्या मुलाचे निधन झाले आहे. जीतू यांच्या मुलाचे नाव आयुष असून त्याचे वय 19 आहे. जीतू यांच्यावर काळानं घाला घातला असून त्यात मुलाच्या निधनानं त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर निधनाची बातमी व्हायरल होताच चाहत्यांनी जीतू यांच्याप्रती सहानुभूती दर्शवली आहे. याशिवाय टीव्ही मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रेटींनी देखील ट्विट करुन आयुषला श्रद्धांजली वाहिली आहे.

कॉमेडियन सुनील पालनं सोशल मीडियावरुन ही धक्कादायक बातमी व्हायरल केली होती. भाभीजी घर पर है मालिकेतून आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केलेल्या अभिनेत्यांमध्ये जीतू यांचे नाव घ्यावे लागते. या अभिनेत्याच्या वाट्याला अकाली पुत्रशोक आल्यानं चाहत्यांना कमालीच्या वेदना झाल्या आहेत. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी आयुषचं जाणं हे अनेकांसाठी धक्कादायक आहे. सुनीलनं आयुषला श्रद्धांजली वाहिली आहे.

Jeetu Gupta Son ayush gupta
Raveena Tondon: रविनानं पुन्हा धरलं बाळसं! कसली दिसतीये...

सुनीलनं इंस्टावर पोस्ट शेयर करुन याविषीय अधिक माहिती दिली आहे. त्यानं लिहिलं आहे की, मी जीतूच्या दु:खात सहभागी आहे. माझा भाऊ जीतू याचा मुलगा आयुष ज्याचं वय 19 वर्ष होतं तो आता राहिला नाही. तो देवाघरी गेला आहे. सुनीलला आपला शोक आवरणं कठीण झाल्याचे हे त्याच्या पोस्टवरुन दिसून आले आहे.

Jeetu Gupta Son ayush gupta
Nikki Tamboli: 'ही' निक्की तांबोळी आहे तरी कोण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com