नॉर्मल डिलिव्हारी व्हावी म्हणून भारतीनं केली आयडिया....

Bharti Singh-Harsh Limbachiyaa
Bharti Singh-Harsh LimbachiyaaInstagram

टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री (Comedian) आणि कॉमेडिची क्विन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Harsh Limbachiyaa) लवकरच आई-बाबा होणार आहेत. या जोडप्याच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली असून, सध्या दोघेही आपल्या प्रोजेक्टस् मध्ये व्यस्थ आहेत. भारतीने 2020 मध्ये, ''आम्ही बेबी प्लॅन करणार आहोत'' असे सांगितले होते. पण कोविडमुळे तो प्लॅन रद्द झाला होता. तर आता मात्र दोघेही घरी बाळाचे आगमन करण्यास सज्ज आहेत.

Bharti Singh-Harsh Limbachiyaa
Bharti Singh-Harsh LimbachiyaaInstagram

भारती आणि हर्ष यांनी मागील महिन्यातच चाहत्यांना गोड़ बातमी दिली. अलीकडेच भारतीने स्वत:ला 'फैट टू फिट' मध्ये ट्रांसफॉर्म केले आहे. भारतीने स्वतःच्या Youtube चॅनेल 'लाईफ ऑफ लिम्बाचीयास' (Life of Limbachiyaas) वरून ही बातमी दिली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिचे सिझेरिअन प्रक्रिये (Cesarean delivery) बाबतचे विचार आणि 'वर्किंग मदर' म्हणून तिच्या मनाची घालमेल व्यक्त केली. सध्या ती नॉर्मल डिलिव्हरीसाठी (Normal delivery) विशिष्ठ प्रयत्न करत आहे. वर्किंग वूमनसाठी सिझेरीन डिलिव्हरी अवघड असते असे ती ऐकून आहे, त्यामुळे ती सिझेरिअन प्रक्रियेला आधीच घाबरून आहे असे म्हणाली.

Bharti Singh-Harsh Limbachiyaa
अर्रर्र...दीपिकानेच केला रणवीरचा पत्ता कट!नवरा-बायकोत नेमकं झालं काय?

''मी वेळेचेवेळ व्यायाम करते आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी माझ्या डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करत आहे. मी सकाळी किमान 1 तास चालते आणि ट्रेनरच्या सूचनेनुसार योगा करते'', असे तिने सांगितले.

Bharti Singh-Harsh Limbachiyaa
Bharti Singh-Harsh LimbachiyaaInstagram
Bharti Singh-Harsh Limbachiyaa
सोहानं पाठवलं दिवंगत वडिलांना वाढदिवसाचं अनोख गिफ्ट;म्हणाली,'अब्बा...'

याचबरोबर भारती कोविडच्या वाढत्या संख्येमुळे घाबरली आहे. परत 'लोकडाऊन' झाले तर ती तिच्या मोलकारीणीशिवाय वेडावेल असेही म्हणाली. भारतीने तिला कोणत्या पदार्थांचे डोहाळे लागले आहेत हे देखील सांगितले. आपल्या 'क्रेविंग्स' बद्दल सांगताना ती म्हणते की तिला हल्ली वडापाव खाण्याची इच्छा होते. ती दिवसातून तीनवेळा लसणाच्या चटणी सोबत वडापाव खाऊ शकते आणि सोबत एक कोल्ड्रिंक सुद्धा घेऊ शकते. ती आपल्या नेहमीच्या अंदाजात म्हणाली की 'कोल्डड्रींक्स' मुळे बाळ काळे तर होणार नाही! शेवटी ती म्हणाली की बाळाचा रंग, मुलगा की मुलगी, यावर तिला काहीही फरक पडत नाही; फक्त बाळ हेल्दी असावं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com