
Pawan Singh: लाईव्ह शोदरम्यान गायकावर दगडफेक.. Video Viral
भोजपुरी स्टार पवन सिंग हा लोकप्रिय गायक आणि अभिनेता आहे. मात्र त्याच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. त्याच्यावर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये तो जखमी झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील आहे.
वास्तविक, सोमवार 6 मार्च रोजी यूपीच्या बलिया जिल्ह्यातील गावात रिसेप्शन पार्टी होती. त्यात भोजपुरी गायका पवन सिंग स्टेजवर परफॉर्म करायचं होता. रणधीर सिंग यांचा मुलगा रणविजय सिंग याच्या लग्नानंतरच्या पार्टीत त्यांला आमंत्रित करण्यात आले होते.
त्यात पवन सिंग आणि त्यांच्यासोबत अभिनेत्री अंजना सिंह आणि डिंपल सिंहही आल्या होत्या. त्याने गाणे सुरू केले आणि काही वेळातच गदारोळ झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्याशी संबंधित आहे. येथील नागरा पोलीस स्टेशन हद्दीतील निकासी गावात कार्यक्रमाला पवन सिंह पोहोचले होते. येथे स्टेज शो सुरू असताना गर्दीतून कोणीतरी पवन सिंह यांच्या दिशेने दगडफेक केली. दगड थेट त्याच्या चेहऱ्यावर लागला. पवन सिंगला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. भोजपुरी इंडस्ट्रीतील पॉवर स्टार पवन सिंह यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.
मात्र पवन सिंहने हल्ल्यानंतर तो दगड उचलला आणि हल्लेखोराला आव्हान दिले. तो म्हणाला हिंमत असेल तर समोरून हल्ला करा. मागून हल्ला करणारे भित्रे असतात. मात्र, त्यानंतर हे प्रकरण शांत झाले आणि कार्यक्रम पार पडला. मात्र सध्या हो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.