MMS: बॉयफ्रेंडशी 'इंटिमेट' होताना दिसलेल्या भोजपुरी गायिकेचा खळबळजनक दावा

प्रसिद्ध गायिका शिल्पी राजचा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा एक अश्लील एमएमएस काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.
Bhojpuri Singer Shilpi Raj
Bhojpuri Singer Shilpi RajGoogle

काही दिवसांपूर्वी भोजपूरी(Bhojpuri) सिनेमांसाठी काही हिट गाणी गाणारी प्रसिद्ध गायिका शिल्पी राजचा(Shilpi Raj) तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा एक अश्लील एमएमएस व्हायरल झाला होता. त्यानंतर शिल्पी विरोधात चर्चेचं नुसतं वादळ उठलं होतं. तेव्हा शिल्पीनं या प्रकरणावर न बोलणं पसंत केलं होतं. पण आता तिनं एका इंग्लीश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्या एमएमएस मागचं सत्य सांगून चुप्पी तोडली आहे. काय म्हणाली आहे शिल्पी?

Bhojpuri Singer Shilpi Raj
कोण होणार कंगनाच्या 'लॉकअप' चा विजेता कैदी? चाहत्यांची उत्सुकता शिगेला...

शिल्पी राज त्या मुलाखतीत म्हणाली आहे,''मी खरं सांगते की मी तो एमएमएस अजून पाहिलाच नाही. मला सांगितलं गेलं की फक्त माझं त्यात नाव समोर आलं आहे. पण मी तेव्हा विचार करत होती की,MMS मध्ये दिसणारी ती मुलगी कोण आहे?'' मुलाखतीत शिल्पीला जेव्हा विचारलं की,'ती MMS मध्ये दिसणारी मुलगी तू नाहीस का?' त्यावर शिल्पी म्हणाली,''हो,त्या व्हिडीओत दिसणारी जी मुलगी आहे,ती मी नाही. हा माझ्या विरोधात कुणीतरी केलेला कट आहे''. शिल्पी पुढे म्हणाली,''इंडस्ट्रीत जेव्हा कुणी पुढे जातं,त्याला यश मिळायला लागतं तेव्हा त्याचे पाय खेचले जातात,त्याला मागे ओढलं जातं. लोकं उगाचच मग तुमच्याविरोधात बोलायला लागतात. इथे महिलांना तर काहीच सन्मान दिला जात नाही''.

Bhojpuri Singer Shilpi Raj
'साऊथ स्टार्सवर बॉलीवूडकर जळतात'; राम गोपाल वर्माची 'अजय-किच्चा' वादात उडी

शिल्पीनं सांगितलं आहे की तिनं कोर्टात केस दाखल केली आहे. सत्य जाणून घेतल्याशिवाय कोणत्याही व्हिडीओ सोबत कोणाचंही नाव जोडणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. माझा MMS लीक झाल्यानंतर माझे भाऊ खूप चिंतेत होते. मला त्यांनी फोन देखील केला, तेव्हा मी त्यांना खरी गोष्ट समजावली.

Bhojpuri Singer Shilpi Raj
थिएटरआधी आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' पोहोचला रेडिओवर; 'कहाणी' लीक की रीलिज?

शिल्पीनं या मुलाखतीत आपल्या पुढील भविष्यातील करिअर प्लॅनविषयी देखील सांगितलं आहे. ती म्हणाली,मला बॉलीवूडसाठी(bollywood) गायचं आहे. पण मी त्यासाठी कोणत्या फिल्म मेकर्सला भेटलेली नाही. माझं काम पाहून मला ऑफर मिळेल यावर माझा विश्वास आहे. सध्या माझं भोजपूरी इंडस्ट्रीत उत्तम सुरू आहे. म्युझिक कंपनीज् मला काम देत आहेत आणि माझ्यासोबत काम करायला उत्सुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com