Bhool Bhulaiya 3: "आम्ही जे तोमार..." मंजुलिका परतली! 'भूल भुलैया 3' मध्ये तब्बूचा पत्ता कट तर आता कोण?

'भूल भुलैया 3'मधून तब्बूचा पत्ता कट झाल्याचे समोर आले आहे.
Bhool Bhulaiya 3
Bhool Bhulaiya 3Esakal

Bhool Bhulaiya 3: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा सध्या त्याच्या आगामी सिनेमांमुळे चर्चेत आहे. कार्तिकने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. तर तो आता निर्माता-दिग्दर्शकांचीही पहिली पसंती आहे.

2024 मध्ये त्याचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्तिक एकामागून एक 3 चित्रपटांमध्ये काम करणार आहे. ज्यात प्रेक्षकांना सगळ्यात जास्त उत्सुकता आहे ती 'भूल भुलैया 3'ची.

कार्तिक आर्यन लवकरच चित्रपटाचे शुटिंग सुरु करणार आहे तर दुसरीकडे या चित्रपटात नॅशनल क्रश तृप्ती डिमरी या चित्रपटात कार्तिकसोबत रोमान्स करताना दिसेल अशा चर्चा असताना आता 'भूल भुलैया 3'मधून तब्बूचा पत्ता कट झाल्याचे समोर आले आहे.

Bhool Bhulaiya 3
Farhan Akhtar Birthday: लग्नाच्या 17 वर्षांनी घेतला घटस्फोट अन् शिबानी दांडेकर सोबत अडकला लग्नबंधनात

आता तब्बू ऐवजी विद्या बालन पुन्हा मंजुलिकाची भूमिका साकारणार असल्याचा दावा मिडिया रिपोर्टमध्ये करण्यात येत आहे.

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, "भूल भुलैया 3 ची कास्टिंग सुरू आहे आणि निर्माते चित्रपटाच्या या तिसर्‍या भागात मंजुलिकाची भूमिका साकारण्यासाठी विद्या बालनशी चर्चा करत आहेत"

Bhool Bhulaiya 3
12th Fail: आणखी एक 'विक्रांत भरारी'! '12th फेल' IMDb वर ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट! मिळालं इतकं रेटींग

'भूल भुलैया'मध्ये विद्याने मंजुलिकाची भूमिका करून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. तर 'भूल भुलैया 2'मध्ये तब्बूला कास्ट करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा या चित्रपटात विद्या बालन दिसणार असल्याने प्रेक्षक उत्सुक आहेत.

अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटाची शुटिंग फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणार आहे. 'भूल भुलैया 3'पूर्वी कार्तिक 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाची शूटिंग करत आहे. 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Bhool Bhulaiya 3
Farah Khan Birthday : टॉपच्या कलाकारांना नाचवणारी फराह खान कधीकाळी स्वतःच होती बॅकग्राउंड डान्सर

कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 'चंदू चॅम्पियन', 'भूल भुलैया 3', 'आशिकी 3' ('Chandu Champion', 'Bhool Bhulaiya 3', 'Aashiqui 3') आणि करणच्या एका चित्रपटात तो दिसणार आहे. यासोबतच तो मुदस्सर अजीज आणि भूषण कुमार यांच्या 'पति पत्नी और वो'च्या सिक्वेल देखील दिसणार आहे. आहे. कार्तिक शेवटचा 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात दिसला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com