Bhool Bhulaiyaa 3: 'मंजुलिका परत येतीये..."; 'भूल भुलैया 3' मध्ये विद्या बालनची एन्ट्री, अक्षयही करणार काम? जाणून घ्या

Bhool Bhulaiyaa 3: भूल भूलैया-3 (Bhool Bhulaiyaa 3) या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या चित्रपटात कार्तिक आणि विद्या हे दोघे दिसणार आहेत.
Bhool Bhulaiyaa 3
Bhool Bhulaiyaa 3

Bhool Bhulaiyaa 3: 'मंजुलिका'चं नाव जरी घेतलं तरी आजही अनेकांच्या अंगावर काटा येतो. "आमी जे तोमार" या गाण्यावर विद्या बालननं केलेला डान्स अन् तिचं भयानक रुप 'मंजुलिका'चं नाव घेतलं की डोळ्यसमोर येतं. भूल भुलैया या चित्रपटाच्या पहिल्या भागात विद्या आणि अक्षय कुमार यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. तसेच या चित्रपटाचा दुसरा भाग देखील आला. भूल भुलैया-2 मध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि तब्बू (Tabu) यांनी काम केलं. आता भूल भूलैया-3 (Bhool Bhulaiyaa 3) या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या चित्रपटात कार्तिक आणि विद्या हे दोघे दिसणार आहेत.

अक्षय कुमार 'भूल भूलैया-3' मध्ये काम करणार?

अक्षय कुमार देखील भूल भूलैया-3 या चित्रपटात काम करणार का? असा प्रश्न फिल्ममेकर अनीस बज्मी यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं, "नाही, अक्षय 'भूल भुलैया 3' चा भाग नाहीये. मला त्याच्यासोबत परत काम करण्याची इच्छा आहे. पण दुर्दैवाने, मी ते करू शकलो नाही. भविष्यात आम्ही नक्कीच एकत्र काम करु."

कार्तिकनं शेअर केला व्हिडीओ

कार्तिक आर्यननं नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आणि विद्या बालन "आमी जे तोमार" या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओला त्याने कॅप्शन दिलं,"ओजी मंजुलिका भुल भुलैयाच्या जगात परत येत आहे. विद्या बालनचे स्वागत करतान खूप आनंद होत आहे. यंदाची दिवाळी खास असणार आहे" कार्तिकनं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पाहा व्हिडीओ:

2007 मध्ये भूल भुलैया हा चित्रपट रिलीज झाला. त्यानंतर 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता भूल भुलैया-3 ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. भूल भुलैया-3 या चित्रपटात आणखी कोणते कलाकार काम करणार? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com