Bhumi Pednekar: बधाई दो मध्ये केली Lesbian ची भूमिका, आई म्हणाली...

Bhumi Pednekar
Bhumi PednekarBadhai Do

अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pedenkar) तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'बधाई दो' (Badhai Do) मध्ये लेस्बियनच्या भूमिकेत दिसली आहे. राजकुमार राव (Rajkumar Rao) स्टारर हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

'बधाई दो'मध्ये लेस्बियनची (Lesbian) भूमिका साकारल्याबद्दल तिच्या आईची प्रतिक्रिया शेअर करताना, भूमीने दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “बधाई दो हा नक्कीच एक चित्रपट आहे जो तुमच्या कुटुंबासह पाहावा. हे प्रेम आणि स्वीकृती साजरे करण्याबद्दलचा चित्रपट आहे. आपल्या समाजाला ज्या गोष्टींबद्दल अस्वस्थता आहे त्याबद्दल बोलण्यासाठी आम्ही विनोदाचा मार्ग स्वीकारला आहे. मी माझ्या आईसोबत हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला. ती विचारांनी खूप बिनधास्त आहे, पण तरीही तिने मला एकाच लिंगातील व्यक्तीशी रोमान्स करताना पाहिले नाही. आम्ही चित्रपट पाहिल्यानंतर, मी तिला विचारले की मला एका स्त्रीवर प्रेम करताना पाहून तिला वेगळे वाटले का? ती म्हणाली अजिबात नाही.”

भूमी म्हणते की चित्रपटात काम करताना ती एक व्यक्ती म्हणून बदलली आहे. ती म्हणाली, “बधाई दोमुळे मी एक व्यक्ती म्हणून वाढले. या चित्रपटासह, माझ्यामध्ये जो काही न्यूनगंड होता, तो निघून गेला. आपण लोकांबद्दल खूप भेदभाव करतो परंतु आता मला खूप हलके वाटत आहे कारण मी तसा विचार करणे बंद केले आहे. मला खरोखर वाटते की या चित्रपटाने मला उत्क्रांत करण्यास मदत केली आणि मला एक चांगली व्यक्ती बनवले.”

Bhumi Pednekar
Syed Mushtaq Ali Trophy कोणी किती वेळा जिंकलीये माहितीये?

अरुणाचल प्रदेशातील चुम दरंगने (Chum Darang) 'बधाई हो'मध्ये भूमीच्या मैत्रिणीची भूमिका केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णी (Harshwardhan Kulkarni) यांनी केले असून त्यात सीमा पाहवा, शीबा चड्डा (Sheeba Chadda) यांच्याही भूमिका आहेत. द हिंदुस्तान टाईम्सने या चित्रपटाच्या पुनरावलोकनात असे लिहिले: "दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी अत्यंत परिपक्व आणि संवेदनशील पद्धतीने विषय हाताळतात, आणि विनोदी आवाजात किंवा पंचलाइन जोडण्याच्या त्यांच्या प्रयत्नात, समलैंगिक लोकांच्या परीक्षेला तो क्षुल्लक वाटत नाही."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com